शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

काश्यपी धरणाचे पाणी गंगापूर धरणात

By admin | Updated: May 8, 2017 02:00 IST

नाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के जलसाठा असलेल्या काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे

लोकमत न्यू नेटवर्कनाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के इतका जलसाठा असलेल्या देवरगाव शिवारातील काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एक हजार ४०३ दशलक्ष घनफूट इतके पाणी काश्यपीमधून गंगापूर धरणात गेले आहे. गंगापूर धरण समूहामध्ये गौतमी, काश्यपी या लहान धरणांचा समावेश होतो. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने काश्यपीचा जलसाठा चांगला होता. एक हजार ७३३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा धरणात होता. ९३ टक्के भरलेल्या काश्यपीमधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास शनिवारी (दि.६) सुरुवात झाली. दीड हजार दलघफू इतके पाणी गंगापूरमध्ये गेले असून, ७५ टक्के जलसाठा काश्यपीमधून गंगापूरमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. २५ ते ३० टक्के पाणीसाठा काश्यपीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.पावसाळा जवळ आल्यामुळे धरणातील पाणीसाठा वर्ग केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डावा, उजवा कालवा, एकलहरे औष्णिक केंद्र आणि महानगरपालिका अशा सर्व घटकांसाठी गंगापूर धरणात पाणीसाठा आरक्षित आहे. गंगापूर धरणावरच शहरवासीयांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीसाठ्याची मागणीही वाढू लागली आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी काश्यपीमधून घेण्यात आलेल्या जलसाठ्याचा मोठा आधार राहणार आहे. या जलसाठ्यामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसाठा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जून महिन्यात वरुणराजाने वर्दी दिली अथवा पावसाचे आगमन लांबले तरीदेखील नाशिककरांवर पाणीटंचाईचे सावट ओढावण्याची चिन्हे सध्या नाही.