नितीन बोरसे सटाणाबागलाण तालुक्यातील करंजाड येथे मोठा गाजावाजा करून उपबाजार समितीची निर्मिती करण्यात आली. चार वर्षांपूर्वी उद्घाटनही केले; परंतु त्यानंतर ही उपबाजार समिती सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. प्रशासनाने आवारात सोयीसुविधा उपलब्ध करूनउपबाजार सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सटाणा बाजार समितीअंतर्गत नामपूर येथे उपबाजार समिती होती. कालांतराने शेतमालाचे उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांची मालविक्रीसाठी सोय व्हावी म्हणून सटाणा बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर ही स्वतंत्र बाजार समिती निर्माण करावी, अशी मागणी होऊ लागली. हा मुद्दा घेऊन दहा वर्षांपूर्वी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राघोनाना अहिरे, माजी आमदार संजय चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या सुकाणू समितीने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. सुकाणू समितीने २०१२मध्ये करंजाड येथे उपबाजार समितीची संकल्पना पुढे आणली. त्यासाठी तत्कालीन संचालक शशिकांत देवरे यांच्या सहकार्याने करंजाड ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे दहा एकर जमीन हस्तांतरित केली. मात्र जमीन हस्तांतरणाची प्रक्रि या पूर्ण होण्यापूर्वीच मोठा गाजावाजा करत या करंजाड उपबाजार समितीचे उद्घाटन याच त्रिमूर्तींनी घडवून आणले. मात्र बाजार समिती चालविण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. वास्तविक बाजार समितीसाठी करंजाड मध्यवर्ती ठिकाण आहे.परिसराचा विकास होईल हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करंजाडवासीयांनी दहा एकर जमीन संस्थेला दिली. मात्र जमीन हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रि या पूर्ण होण्यापूर्वीच सुकाणू समितीला मिरवणूक घेण्याची हौस आली म्हणून त्यांनी करंजाड येथे उपबाजार समितीच्या उद्घाटनाचा घाट घातला. मात्र त्यासाठी शासकीय पूर्तता अपुरी असल्यामुळे एकदा मका खरेदीचा त्यानंतर चार वर्षांपासून कामकाज बंद आहे. ते आजही सुरू झाले नाही. वास्तविक करंजाड येथे बाजार समिती असणे आवश्यक आहे.
करंजाड उपबाजार चार वर्षांपासून बंद
By admin | Updated: July 8, 2016 22:59 IST