शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

कांदाप्रश्नी उद्या लासलगावी रेल्वे रोको

By admin | Updated: August 13, 2014 00:38 IST

कांदाप्रश्नी उद्या लासलगावी रेल्वे रोको

कळवण : शेतकरीराजा आर्थिक संकटात सापडला असून, कांदा, बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश व कांदा निर्यातमूल्यात वाढ केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्र मक भूमिका घेतली आहे. १४ आॅगस्टला लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील, जिल्हाध्यक्ष देवीदास पवार यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीला तोंड देत कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांदा निर्यातमूल्यात वाढ करून कांदा निर्यात लादल्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. कांदा व बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तंूमध्ये समावेश करून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. रेल्वे रोको आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी करणार असून, जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.महिला महाविद्यालयात रासेयोचे उद्घाटनंमालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून विद्यार्थिनींनी राष्ट्र उभारणी व समाज उभारणीसाठी स्वावलंबी बनावे, असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.ए. पवार यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय मनोगत उपप्राचार्य श्रीमती नवनीता देसले यांनी व्यक्त केले. जागृती विद्यालयात रक्षाबंधन ंमालेगाव : येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित जागृती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विद्यालयातील विद्यार्थी मिळून रक्षाबंधन सण साजरा केला. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्र संरक्षण या मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी धर्मरक्षण व हिंदू संस्कृती याविषयी माहिती दिली. कौळाणे (गा.) येथे ज्ञानेश्वरी पारायणकौळाणे (गा.) : येथे परंपरेनुसार ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू झाला. सप्ताह दैनंदिन कार्यक्रम - पहाटे हरिपाठ, काकडा आरती, भूपाळी, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ज्ञानेश्वरी पारायण, सायं. प्रवचन, सार्वजनिक हरिपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तने होतील. त्यात ह.भ.प. अशोक महाराज, औरंगाबादकर, ज्ञानेश्वर महाराज, वरखेडी, गोपाल महाराज चिमटाणेकर, रमेश महाराज टाकळी, कदम महाराज निळखेडे व मुरलीधर महाराज कढरेकर यांची कीर्तने व प्रवचने होतील. १८ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वेरुळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. चिखलओहोळ शाळेत पवार यांचे मार्गदर्शनंमालेगाव : तालुक्यातील चिखलओहोळ जिल्हा परिषद शाळेत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी.जे. पवार व एस.ए. निकम यांनी भेट देऊन शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन केले. शाळा श्रेणी स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.