शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

कळसूबाई शिखर आता झळाळणार

By admin | Updated: June 26, 2014 01:02 IST

कळसूबाई शिखर आता झळाळणार

 

नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखरावर महावितरणच्या विद्युतवाहिन्या, रोहित्रचे काम पूर्ण झाल्याने कळसूबाई शिखर आता रात्रीदेखील विजेच्या प्रकाशात चमकू लागणार आहे. यामुळे पर्यटकांची आता मोठी सोय झाली आहे. कळसूबाई शिखर महावितरण राजूर उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येते. कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर म्हणजेच सुमारे ५४०० फूट इतकी आहे. कळसूबाई शिखर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत असून, त्याकरिता विद्युतीकरण करणे अत्यावश्यक होते. त्यानुसार शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावापासून शिखरापर्यंत ११ केव्ही दाबाची सुमारे तीन किमी लांबीची भूमिगत वाहिनी टाकण्याचे व शिखरावर ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे व लघुदाब वाहिनी उभारण्याचे अवघड काम नुकतेच पूर्ण झाले. महावितरणने केलेल्या या कामाचे उद्घाटन नुकतेच आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते बारी येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता के. व्ही. अजनाळकर, अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी, कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी, सहायक अभियंता व्ही. ए. बाऊस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे सदर कामाची मुदत आॅगस्ट २०१४ असताना दोन महिने आधीच काम पूर्ण करण्यात आले. (प्रतिनिधी)