शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास कलामंदिरचे व्यवस्थापककहाणे अखेर निलंबित

By admin | Updated: June 18, 2015 00:06 IST

दुरवस्था भोवली : अतिरिक्त आयुक्तांकडून कारवाई

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबाबत अभिनेता भरत जाधव यांनी चार दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर एकूणच कालिदासची दुरवस्था लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी त्याची गंभीर दखल घेत कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. कहाणे यांच्याबद्दल वाढत्या तक्रारींमुळे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे रंगकर्मींनी स्वागत केले आहे. गेल्या शनिवारी अभिनेता भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाचा कालिदास कलामंदिरात प्रयोग होता. परंतु आधीच्या कार्यक्रमामुळे प्रयोगाला झालेला विलंब, तसेच कालिदास कलामंदिरातील अस्वच्छता, अव्यवस्था पाहून भरत जाधव कमालीचे संतापले आणि थेट महापालिका आयुक्तांनाच दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली. आयुक्त डॉ. गेडाम हे सिंहस्थ कामात व्यस्त असल्याने त्यांनी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांना भरत जाधव यांची भेट घेण्यासाठी पाठविले होते. सोनवणे यांनी महिनाभरात कालिदासची स्थिती सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर भरत जाधव यांच्या रागाचा पारा खाली आला होता. दरम्यान, सोनवणे यांनी त्यावेळी कालिदासचे व्यवस्थापक जे. के. कहाणे यांचेशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कहाणे यांचा मोबाइल स्विच आॅफ होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी कालिदासच्या एकूणच स्थितीचा अहवाल मागविला होता. याशिवाय सोनवणे यांनी शहरातील काही रंगकर्मींचीही मते जाणून घेतली. त्यात कालिदासचे व्यवस्थापक कहाणे यांच्याविषयी तक्रारींचा पाऊस पडत कहाणे यांना त्वरित हटविण्याची सूचना रंगकर्मींनी केली होती. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी बुधवारी कहाणे यांना कालिदासच्या दुरवस्थेबद्दल जबाबदार ठरवित त्यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारला आहे. याशिवाय कहाणे यांच्याकडे दादासाहेब फाळके स्मारकाचाही कार्यभार असून, स्मारकातील कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून वेतनच केले नसल्याची बाबही समोर आली आहे. वाढत्या तक्रारी लक्षात घेता अतिरिक्त आयुक्तांनी निलंबनाचे आदेश काढले. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या या कारवाईचे रंगकर्मींनी स्वागत केले असून, कालिदासला ‘अच्छे दिन’ आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)