शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यातील धरणे फुल्ल !

By admin | Updated: September 13, 2014 00:56 IST

कळवण तालुक्यातील धरणे फुल्ल !

कळवणतालुक्यात सुरू असलेल्या संततधारेने चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पासह तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव, सीमेंट बंधारे १०० टक्के भरले आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीपात्रात हजारो क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा व पुनंद नदीला पूर येणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शेकडो पाझर तलाव व सीमेंट बंधारे पावसामुळे फुल्ल झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली असून, लपा प्रकल्प, तलाव व बंधारे शेतकरी बांधवांना वरदान ठरले आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबरपर्यंत चणकापूर धरण लाभक्षेत्रात ५०१ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी आजपर्यंत ८०२ मिमी पाऊस झाला असल्याची नोंद शासन दप्तरी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३०० मिमी पाऊस जास्त झाल्याने लपा प्रकल्प व तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. यावेळी सर्व नद्या, नाले पाण्याने तुडुंब वाहत आहेत. चणकापूर उजव्या कालव्यालादेखील पाणी सोडल्याने कालवा क्षेत्रातील विहिरीच्या पातळीत वाढ झाली असून, एक महिन्यापासून जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी व नाले यांना पूर आला आहे. चणकापूर व अर्जुनसागर या प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीत हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. (वार्ताहर)