शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कडूंच्या दणक्यानंतर पालिकेची सारवासारव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:50 IST

नाशिक :आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर महापालिकेकडून आता अपंगांसाठी केलेली कामे दाखविण्यासाठी सारवासारव चालविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : १९९५ पासून अपंगांसाठी लागू करण्यात आलेल्या पुनर्वसन कायद्याची न झालेली अंमलबजावणी आणि ३ टक्के राखीव निधी खर्चाबाबत उदासीनता याप्रश्नी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर महापालिकेकडून आता अपंगांसाठी केलेली कामे दाखविण्यासाठी सारवासारव चालविली आहे. चार वर्षांपूर्वी महापालिकेने अपंगांचे केलेले सर्वेक्षणही कागदावरच राहिले असून, त्यांच्यासाठी केलेल्या कामांची यादी महापालिका प्रशासन सादर करू शकलेली नाही. त्यामुळे, अपंगांप्रश्नी मनपाने केलेले दावे पोकळ असल्याचे चित्र दिसून येत आहे.  आमदार बच्चू कडू यांनी आयुक्तांवर हात उगारल्यानंतर त्यांच्या कृतीचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात आला. परंतु, दुसरीकडे कडू यांनी अपंगांसंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरीतच आहेत. कडू यांच्या दणक्यानंतर महापालिकेने अपंगांसंबंधी केलेल्या कामांची माहिती प्रसिद्धीपत्रकान्वये जाहीर केली असली तरी त्याद्वारे ठोस कोणताही कृती कार्यक्रम राबविला गेला नसल्याचे अधोरेखित झाले आहे. महापालिकेने सर्वशिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे. पुन्हा करणार सर्वेक्षणमहापालिकेने २०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ५०८ अपंग आढळून आल्याचे म्हटले आहे. वास्तविक ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. मनपाच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या या ५०८ अपंग बांधवांसाठी मनपाने कोणते प्रकल्प राबविले याचीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे चार वर्षांपासून सर्वेक्षण कागदावरच राहिलेले आहे. आता वैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, अपंग बांधवांनी त्यांचे निवासी क्षेत्रातील मनपाच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.