शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कड, सय्यद यांना राष्ट्रपतिपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:18 IST

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल, तर विशेष शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबाबत सोमवारी (दि़१४) राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे़ नाशिक परिक्षेत्रात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमध्ये कड यांना तर शहर पोलीस आयुक्तालयात २७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सय्यद यांच्या रूपाने कर्मचाºयास राष्ट्रपतिपदक मिळाले आहे़

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल, तर विशेष शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबाबत सोमवारी (दि़१४) राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे़ नाशिक परिक्षेत्रात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमध्ये कड यांना तर शहर पोलीस आयुक्तालयात २७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सय्यद यांच्या रूपाने कर्मचाºयास राष्ट्रपतिपदक मिळाले आहे़ १९९२ साली मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत प्रवेश केला़ त्यानंतर नागपूरला दहा वर्षे, परळी व औरंगाबाद (सात वर्षे), नाशिक ग्रामीणमधील घोटी पोलीस ठाणे (१ वर्षे), दहशतवाद विरोधी पथक (साडेचार वर्षे), भद्रकाली पोलीस ठाणे दोन वर्षे व सद्यस्थितीत अंबड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत़ मुंबईतील जव्हेरीबाजार व मुंबादेवी बॉम्बस्फोट खटला तसेच पुणे येथील जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची कामगिरी कड यांनी बजावली आहे़ पोलीस दलातील उल्लेखनीय कामाबाबत त्यांना २७५ रिवॉर्ड मिळाले असून, २००८ मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्हही मिळाले आहे़१९७९ मध्ये पोलीस शिपाई या पदावर भरती झालेले व सद्यस्थितीत शहर पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले मुजफ्फर अन्वर सय्यद यांना नाशिकमधील १९९१, २००३ व २०१५ या तीन सिंहस्थ कुंभमेळ्याचा नियोजनाचा अनुभव आहे़ याबरोबरच त्यांना कुंभमेळा नियोजनासाठी अलाहाबाद, उज्जैन याठिकाणीही पाठविण्यात आले होते़ सय्यद यांना २०१२ मध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली असून, त्यांनी गुन्हे शाखेत असताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे़ राष्ट्रपतिपदक मिळाल्याबाबत पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल तसेच वरिष्ठ अधिकाºयांनी या दोघांचेही अभिनंदन केले आहे़