शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला इकडे येण्याची संधी, विचार करता येईल, विधिमंडळातच फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
7
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
8
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
9
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
10
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
11
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
12
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
13
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
14
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
15
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
16
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
17
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
18
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
19
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
20
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

अवघ्या आयुष्याचा ‘तमाशा’ झालाय, सण कोठून करणार?

By admin | Updated: November 1, 2015 21:50 IST

कलावंतांची व्यथा : गावोगावच्या दौऱ्यांतच सरते दिवाळी; फटाके, नवीन कपडे दूरच, गोडधोडही मिळते नशिबानेच

नाशिक :वर्षातले दोन-पाच महिने गावोगावी हिंडावे, बाजार-जत्र्यात तमाशाचे खेळ करावेत, मिळतील ते पैसे जमवावेत आणि त्यातून वर्षभर कुटुंबाच्या पोटाची आग शमवावी... आयुष्याचे हेच चक्र होऊन बसलेल्या ‘त्यांना’ सण कधी येतो, कधी जातो, हे कळतही नाही... सणाविषयी विचारल्यावर त्यांच्या तोंडून फक्त हताश उद्गार बाहेर पडतात, ‘आयुष्याचाच ‘तमाशा’ झालाय, सण कुठून साजरे करणार?’ - ही व्यथा आहे तमाशा कलावंतांची. वर्षानुवर्षांपासूनची ही कला आता पार अस्तंगत होत चालली आहे. राज्यात तमाशाची दहा-पंधरा मोठी मंडळे उरली आहेत. दसरा ते अक्षय्यतृतीया असे सहा-सात महिने त्यांचे कार्यक्रम होतात. छोटी मंडळे मात्र गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंतच तमाशा करतात. नाशिक जिल्ह्यात अशा वीसेक पार्ट्या आहेत. महाशिवरात्रीनंतर त्यांच्या सुपाऱ्या ठरण्यास प्रारंभ होतो आणि तारखा ठरवल्या जातात. जिथली सुपारी असेल त्या गावी दोन ट्रक, दोन बसेससह दुपारी पोहोचावे, साहित्य उतरवावे, तंबू, स्टेज उभारावेत, रात्री नऊला तमाशा सुरू करावा, तो पाचेक तासांनी संपल्यावर मध्यरात्री पोटात चार घास ढकलावेत आणि जमिनीला पाठ टेकावी... दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दोन तासांची ‘हाजरी’ (हजेरी) सादर करावी अन् पुढल्या गावाला चालू लागावे, असा या कलावंतांचा दिनक्रम. तमाशात गण, गवळण, रंगबाजी (लावण्या, नृत्ये), वगनाट्य सादर केले जाते, तर दुसऱ्या दिवशीची ‘हजेरी’ ही तमाशाचीच छोटी आवृत्ती असते. फक्त त्यात वगनाट्याऐवजी ‘फार्सा’ (विनोदी नाटिका) सादर केली जाते. जिल्ह्यात नांदूरशिंगोटे, येवला या भागात तमाशाच्या पार्ट्या तग धरून आहेत. मंडळ लहान असले, तरी त्यात ४० ते ४५ माणसांचा कबिला असतो. त्यात स्त्री-पुरुष कलावंत (गायक, वादक, नर्तक, वगनाट्यातील अभिनेते, सोंगाड्या वगैरे), बिगारी, आचारी, ड्रायव्हर असे सारेच आले. या प्रत्येकाचे वेतन रोजावर वा मासिक पगारावर साधारणत: पाचशे ते सातशे रुपये प्रतिदिन या प्रमाणात असते. तमाशाची सुपारी २५ हजारांपासून ते पार दीड लाखापर्यंत दिली जाते. सुपारीच्या रकमेवर कलावंतांची संख्या अवलंबून असते. दोनेक महिन्यांचा हा मोसम पूर्णत: फिरतीवरच काढला जातो. तो आटोपल्यावर उरलेले वर्ष कोणी जागरण-गोंधळ करते, कोणी मोलमजुरी, तर कोणी मोठ्या पार्टीत जाऊन काम करते. तमाशा पार्टीचा मालक असो की कलावंत, दोघेही समदु:खीच. चाळीसेक व्यक्तींचे वेतन देणे मालकाला परवडत नाही. मोसम सुरू होण्यापूर्वी सगळ्या कलावंतांना ठिकठिकाणाहून खास सरावासाठी पंधरा दिवस आधी बोलवावे लागते, त्यांची निवास-भोजनाची व्यवस्था करावी लागते. तमाशाच्या आयोजक मंडळीकडून अनेकदा ठरलेले पैसेही ‘कार्यक्रम रंगला नाही’चे कारण पुढे करीत दिले जात नाहीत. अशा एक ना अनेक व्यथा. त्यामुळे अनेक कार्यक्रम करूनही हातात पैसा उरत नाही.मालकच विपन्नावस्थेत असेल, तर कलावंतांची अवस्था सांगायलाच नको; पण या कलावंतांना- विशेषत: महिलांना दारिद्र्याच्या चटक्यांबरोबर समाजाचा तिरस्कारही सहन करावा लागतो. रस्त्याने चालतानाही ‘तमाशावाली’ किंवा ‘नाचणारी’ आली’, असे टोमणे ऐकावे लागतात. त्यांच्याकडे हमखास वाईट नजरेने पाहिले जाते. कलावंतांच्या मुलांनाही ‘तमासगीराचा पोर तू, शिकून काय कलेक्टर व्हनार का’, अशी शेरेबाजी ऐकावी लागते. सतत फिरतीवर असल्याने कलावंतांना साध्या तारखाही आठवत नाहीत, तेव्हा सणाची गोष्ट दूरच राहते. दिवाळीच्या दिवशी मात्र राहुटीत लक्ष्मीपूजन केले जाते, कोणी बाहेरून गोडधोड आणते. तेवढेही पैसे नसतील, तर तंबूतच शिरा परतवला जातो. मुले-बायका गावी असल्याने नवे कपडे तर सोडा; पण त्यांना आपल्या माणसाचा चेहराही महिनोन् महिने दृष्टीस पडत नाही. महाराष्ट्रातील एकेकाळचे प्रख्यात तमाशा कलावंत दिवंगत दत्ता महाडिक यांचे चिरंजीव विनायक महाडिक यांचे नांदूरशिंगोटे येथे तमाशा मंडळ आहे. ते सांगतात, ‘तमाशा कलावंताला अनेकदा चहासुद्धा मिळत नाही. स्मशानाच्या कडेला बसून पोटात चार घास ढकलावे लागतात, तो काय सण साजरा करणार? फटाके, कपडे हे सगळे श्रीमंतांचे चोचले आहेत. त्यांना सण आल्यावर आनंद होतो. पोटासाठी गावोगाव हिंडणाऱ्या कलावंताला मात्र सण आल्यावर काळजीच जास्त वाटते...’ - त्यांच्या शब्दांतून माणसांच्या एका उपेक्षित समूहाची व्यथाच नुसती उलगडतच नाही, तर ती संवेदनशील माणसाच्या काळजाला घरेही पाडते!