शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायप्रविष्ट प्रकरण : निळ्या रेषेत बांधकामाला आक्षेप

By admin | Updated: April 26, 2017 01:46 IST

नासर्डी नदीला संरक्षकभिंत बांधण्यास हरकत

नाशिक : शहरातील नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असताना त्याची अंमलबजावणी सोडाच उलट पक्षी महापालिकाच नासर्डी नदीपात्रात भराव टाकून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. या बांधकामास पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी आक्षेप घेतला असून, भराव त्वरित हटवावा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. मनसेच्या काळात रेटून मंजूर झालेल्या या भिंतीच्या कामाला त्यामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत मनसेने हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यावेळी सुमारे सात कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यास अनेकांनी विरोध केला होता. नदीपात्रात भराव करून जमीन तयार करणे आणि त्या माध्यमातून नदीप्रवाहाला अवरोध करण्याच्या या कामाविषयी शंका घेतली जात होती. परंतु तरीही मंजूर झालेल्या कामाला अलीकडेच मुहूर्त लागला असून, नदीपात्रालगत वेगाने काम सुरू आहे. आता या कामालाच आक्षेप घेण्यात आला आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्च रोजी झालेल्या सुनावणीत निळ्या पूररेषेतील आणि नदीपात्रातील सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते; मात्र सध्या नदीपात्रात हॉटेल किनारा (मुंबई नाका) ते नाशिक-पुणे रोड दरम्यान अनेक ठिकाणी नदीपात्रात भराव टाकून संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी निरीने दिलेल्या सूचना व आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे या बांधकामामुळे उल्लंघन होत आहे, असे राजेश पंडित यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. नदीपात्रात चालू असलेले काम त्वरित थांबवावे, तसेच नदीपात्रात काहीही बांधकाम करायचे असल्यास निरी आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीनेच करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.