शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ ब्रिगेडने पाळला दुखवटा दिवस

By admin | Updated: March 10, 2017 02:01 IST

नाशिक : राज्यात महिला व बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मेणबत्ती पेटवून रॅली काढून दुखवटा दिवस पाळण्यात आला.

 नाशिक : राज्यात महिला व बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मेणबत्ती पेटवून रॅली काढून दुखवटा दिवस पाळण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. ब्रिगेडच्या अध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी मेहेर चौकातून महिलांनी रॅली काढली. यावेळी प्रत्येक महिलेच्या हातात मेणबत्ती पेटविण्यात आली होती. आमदार परिचारक यांनी सैनिक पत्नी संदर्भात काढलेले अनुद्गार, म्हैसमाळ येथे भ्रूण हत्त्या, कोपर्डी घटना यांसारख्या महिला व बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, ग्रामीण भागात महिलांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, स्त्रियांना स्वसंरक्षणाच्या कोणत्याही योजना नाहीत, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण चिंताजनक असून, महिलांच्या आर्थिक विकासासाठी महामंडळे तुटपुंजे ठरत आहेत असे असताना महिला दिन कोणत्या आनंदाने साजरा करायचा? कोपर्डी घटनेतील आरोपींना अद्यापही शिक्षा झालेली नाही, आमदार परिचारकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे असताना जिजाऊ ब्रिगेडने महिला दिन साजरा न करता, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहून दुखवटा पाळत असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर ज्योती काथवटे, चैताली बेजेकर, वैशाली वाक््चौरे, कांचन सहाणे, अश्विनी पाटील, नमिता पाटील, वैभवी देसले, दीपाली डुमरे, विद्या गडाख, चंद्रप्रभा मावळे, अर्चना रायकर, अंकिता पाटील, अनुपमा मराठे, साधना देशमुख, मंजूषा व्यवहारे, जया राजे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.