शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जानोरी आरोग्य केंद्र बंद अवस्थेत

By admin | Updated: May 25, 2016 00:05 IST

ग्रामस्थांचे हाल : लसीकरण होते अंगणवाडीत

 दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.२ तीन ते चार महिन्यांपासून सतत बंद अवस्थेत असल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचारी अंगणवाडीत बसून लसीकरण करतानाचे चित्र आहे. ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत जानोरी येथे लोकसंख्यानुसार केंद्र- १ व केंद्र- २ अशी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. केंद्र-१ हे वरच्या कोळीवाड्यात आहे, तर केंद्र-२ हे महात्मा फुले विद्यालयाच्या समोर बसथांबा जवळ आहे. परंतु काही किरकोळ कारणास्तव प्राथमिक आरोग्य केंद्र-२ तीन ते चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, गैरसोयीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या दिवशी अंगणवाडीत बसून लसीकरण मोहीम राबवितानाचे चित्र आहे. आरोग्य केंद्र-२ ला जऊळके दिंडोरी हे गाव जोडले गेले आहे; परंतु आरोग्य केंद्राला कुलूप पाहून ग्रामस्थ आल्या पावली परतीचा मार्ग धरतात. या दोन्हीही आरोग्य केंद्रांत अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांची संख्या गरजेपेक्षा कमी होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन लसीकरण माहीम राबविणे गरजेचे आहे. मात्र असे न घडता येथील कर्मचारी कोणत्याही ठिकाणी राहतात अथवा तिथेच वावरताना दिसतात. आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे दवाखान्यात कोणकोणत्या प्रकारची औषधे आहेत हेदेखील ग्रामस्थांना समजत नाही. अनेकवेळा ही बाब ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी आर.पी. पालवी यांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र अद्याप यावर कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. आरोग्य केंद्रामार्फत जननी सुरक्षा व मातृत्व सुरक्षाचे धनादेश वाटप केले जातात. मात्र आरोग्य केंद्रच बंद असल्याने ग्रामस्थांनी नेमके कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे ग्रामस्थांना व रुग्णांना चार कि.मी. अंतरावरील मोहाडी येथे जावे लागते. तरी आरोग्य केंद्र विभागाने येथील कर्मचाऱ्यांना योग्य समज देऊन आरोग्य केंद्र लवकरात लवकर नियमित सुरू करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)