शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

करकोंडी सोडविण्यासाठी उद्या जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:02 IST

नाशिक : मनपाने केलेल्या कर आणि दरवाढीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविली असल्याने येत्या शनिवारीच ते नाशिकमध्ये दाखल होऊन विविध समाजघटकांच्या भावना समजून घेणार आहेत. त्याच दिवशी किंवा सोमवारी (दि. २३) महासभा होण्याच्या आतच यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे विश्रामगृहावर पालकमंत्री गिरीश महाजन हे शेतकरी आणि अन्य घटकांशी चर्चा करणार शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : मनपाने केलेल्या कर आणि दरवाढीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविली असल्याने येत्या शनिवारीच ते नाशिकमध्ये दाखल होऊन विविध समाजघटकांच्या भावना समजून घेणार आहेत. त्याच दिवशी किंवा सोमवारी (दि. २३) महासभा होण्याच्या आतच यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री गिरीश महाजन हे शेतकरी आणि अन्य घटकांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली.महापालिकेच्या वतीने यंदा घरपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर लगोलग आयुक्तांनी त्यांच्या विशेषाधिकारात जमिनीचे करयोग्य मूल्य निश्चित केले. त्यात मोकळ्या भूखंडावर कर लागू करण्यात आला आहे. शेतीला कर लागू होणार असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात ओरड झाली होती. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे त्यात खुलासा करून हरित क्षेत्रात कर लागू नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तथापि, गेल्याच वर्षी शहर विकास आराखडा मंजूर झाला त्यात ८० टक्के रहिवासी क्षेत्र असून, त्यात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत, त्यावर मात्र कर लागूच राहणार आहे. त्यामुळे गावठाण भागात शेतकऱ्यांचे मेळावे सुरूच असून, त्यांच्या धास्तीने भाजपाने तातडीने २३ तारखेला करवाढीच्या विरोधात विशेष महासभा बोलावली आहे. तत्पूर्वी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये येऊन शेतकरी उद्योजक आणि अन्य घटकांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. व महाजन हेच प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढतील असे कळविले असल्याने ते शनिवारी नाशिक दौºयावर येऊन शेतकरी आणि अन्य घटकांशी चर्चा करणार आहेत.वॉक विथ कमिश्नरकडे लक्ष४महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी (दि. २१) वॉक विथ कमिश्नर उपक्रम राबविणार असून त्यातही अनेकांनी करवाढीसंदर्भात प्रश्न विचारण्याची तयारी केली आहे. गावठाण भागात बैठका सुरूचकरवाढ विरोधातील शेतकºयांच्या बैठका सुरूच असून, या सर्व ठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. २३ तारखेला करवाढीच्या विरोधात विशेष महासभा असल्याने त्या दिवशी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चा, रास्ता रोको आणि नाशिक बंद अशाप्रकारचे आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेता गजानन शेलार यांनी सांगितले.