नाशिकरोड : नाशिकरोड परिसर व आजूबाजूच्या ग्रामीण भागांतून मराठा समाजबांधव सहकुटुंब मोर्चात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडल्याने सर्वत्र ‘मराठा एकजुटीचा जागर’ दिसून येत होता. नाशिक-पुणे महामार्ग, जेलरोड मार्गे मोर्चेकरी जात असल्याने परिसर भगव्या झेंड्यांनी फुलून गेला होता.कोपर्डी बलात्कार घटनेच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चासाठी देवळालीगांव, विहितगांव, जेलरोड, जयभवानीरोड, चेहेडी, जगताप मळा, दसक, पंचक, मळे परिसर आदि सर्व परिसरातून मराठा समाज बांधव कुटुंबासह दुचाकी, चारचाकी वाहनातुन मोर्चात सामील होण्यासाठी घराबाहेर पडले होते. प्रत्येक रस्त्यावर मोर्चात सामील होण्यासाठी भगवे झेंडे लावलेल्या वाहनातुन मराठा समाजबांधव जातांना दिसत होते. मोर्चामुळे मराठा समाज बांधव व इतर व्यावसायिकांनीदेखील दुकाने, हॉटेल व आपले सर्व व्यवहार बंद ठेवल्याने सर्वत्र अघोषित बंदचे वातावरण होते. नाशिकरोडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत तालुक्याच्या पूर्व भागातुन पायी-पायी व वाहनामधुन आलेले मराठी समाज बांधवांचे जथ्थेच्या जथ्थे मोर्चाला जात होते. जेलरोड परिसरातूनदेखील मराठी समाजबांधव, महिला एकत्रितरीत्या अत्यंत शांततेने नांदुरनाका मार्गे तपोवनाकडे जात होते. सकाळी ९.३० वाजेनंतर नाशिक-पुणे महामार्ग व जेलरोड मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. तर अनुराधा चौकात मोर्चेकऱ्यांना भगवा टिळा लावण्यात येत होता.भगूर परिसर गर्दीने फुललाभगूर : भगूर परिसरातून व ग्रामीण भागातून हजारो मराठा समाजबांधव मूक मोर्चासाठी सकाळपासून रवाना होत असल्याने संपूर्ण परिसर मोर्चेकऱ्यांनी फुलून गेला होता.मराठा मुक मोर्चाची लॅमरोड, देवळाली कॅम्प, भगूर, बेलतगव्हाण, संसरी, नानेगाव, लहवित, पांढुर्ली, राहुरी, दोनवाडे, घोरवड, विजयनगर, शेणीत, वंजारवाडी आदि गावांमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. या भागातून शनिवारी सकाळपासून मराठा समाज बांधव, महिला हे विविध वाहनातून जात होते.सर्वत्र वाहतूक ठप्पनाशिक तालुक्याच्या पूर्व भागातून, सिन्नरकडून व देवळाली कॅम्प भगूरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मराठा समाज बांधव, महिला ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, बस, पिकअप व्हॅन, जीप आदि विविध वाहनांसह दुचाकीवरून मोर्चाला जाण्यासाठी निघाल्याने नाशिक-पुणे महामार्ग व बिटको चौकातून जेलरोडवर वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. शिवाजी पुतळा, बिटको चौकात स्वयंसेवक स्वत: वाहतुकीचे नियोजन करत होते.
जेलरोड भगवेमय
By admin | Updated: September 25, 2016 01:23 IST