शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जय हनुमान ज्ञान गुणसागर... जय कपिस तिहूूॅ लोक उजागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:34 IST

वाके : चैत्र पौर्णिमेला येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नित्य मारुती स्तोत्राचे पठण करीत ...

ठळक मुद्देजयंतीचा उत्साह : हनुमान चालिसा पठण; कोरोनाच्या सावटाने मंदिरांमध्ये साध्या पद्धतीने धार्मिक विधी

वाके : चैत्र पौर्णिमेला येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नित्य मारुती स्तोत्राचे पठण करीत सकाळी सूर्योदयाच्या वेळी मारुती आरतीच्या गजरात पाळणा हलवून हनुमान जयंती साजरी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर भजनी मंडळाने मंदिरात ठरावीक सुरक्षित अंतर ठेवूनच मूर्ती अभिषेक, तेलमिश्रित शेंदूर लावून मंदिर परिसरात सॅनिटायझर, केवडा, चमेली, अंबर, गुलाबजल शिंंपडून एकानेच महाआरती केली.जमावबंदी असल्याने मंदिरात गर्दी न करता भजनी मंडळाच्या निवडक सदस्यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नव्हता. हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाधर कानडे, त्रंबकेश्वर बच्छाव, शांताराम कानडे, दिगंबर कानडे, मधुकर बच्छाव, केदा महाराज, समाधान बच्छाव, राजेंद्र बच्छाव, दिगंबर बच्छाव, संदीप बच्छाव, पौरोहित्यकार चंद्रकांत कुलकर्णी, दादाजी गोसावी, शिवाजी कानडे आदींनी यावेळी सहकार्यकेले.अंदरसूलला हनुमान चालिसा पठणअंदरसूल येथे साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. मंदिरामध्ये हनुमान चालिसा पठण, पूजा व आरती करण्यात आली. दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सोशल डिस्टन्सिंग पाळून पूजा-आरती करण्यात आली.कोरोनाच्या नायनाटासाठी आराधनाखेडलेझुंगे येथे कोरोनामुळे खेडलेझुंगे व परिसरातील सण आणि उत्सवांनादेखील फटका बसलेला आहे. हनुमान जयंती घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करत साजरी केली. योगीराज तुकाराम बाबा स्मारक मंदिरात संस्थानचे उत्तराधिकारी रघुनाथबाबा खेडलेकर व तुकारामबाबा भक्त परिवारातर्फे नागरिकांना येथे न येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सर्वांनी घरीच हनुमान जयंती साजरी केल्याचे दिसून आले. तर मारुतीच्या मूर्तीपुढे कोरोना विषाणूच्या नायनाटासाठी आराधना करण्यात आली.मालेगावसह परिसरात धामधुमीला विराममालेगाव येथील संगमेश्वरासह परिसरात यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. दरवर्षी असणारी भाविकांची गर्दी आणि मंदिराची सजावट, विद्युत रोषणाई यंदा दिसून आली नाही. खबरदारी म्हणून सर्वच धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. यंदा प्रथमच मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला. येथील सांडवा पूल परिसरात दरवर्षी भरणारी सप्तशृंगी देवीची यात्रा भरली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात धार्मिक विधीही झाले नाहीत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम