शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जागर दिंडी : आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची आर्त हाक

By admin | Updated: January 11, 2015 00:58 IST

मायबापहो तुम्ही चूक करू नका

पंचवटी : वडिलांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते, त्यातच बळीराजाने पाठ फिरविली, घेतलेले कर्ज फेडता आले नाही म्हणून आमच्या वडिलांनी आत्महत्त्या केली. आम्ही पोरके झालो तुम्ही नाराज होऊ नका, आत्महत्त्या करणे पर्याय नाही मायबापहो आमच्या वडिलांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका, लेकराबाळांना उघड्यावर सोडू नका, असे आवाहन आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी केले. आधारतीर्थ आधाराश्रम, त्र्यंबकेश्वर व सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या वतीने सकाळी दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सकाळी बळीराजासाठी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. या जागरदिंडीचे उद््घाटन भिवंडी मनपा आयुक्त जीवन सोनवणे, विजया सोनवणे, प्रमोद गायकवाड, त्र्यंबक गायकवाड यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले. प्रारंभी मुलांनी बाजार समितीतून फेरी काढून शेतकऱ्यांना पत्रके वाटप केले. त्यानंतर बाजार समितीबाहेर गीत सादर करून पथनाट्य केले. जागरदिंडीत शेकडो आत्महत्त्याग्रस्तांची मुले टाळ-मृदुंगासह सहभागी झाले होते. आत्महत्त्या केल्यानंतर स्वत:ची कुटुंबाची काय परिस्थिती होते याची व्यथा यावेळी चिमुकल्यांनी मांडून निरागस न होता धीर धरावा, चुका करू नका, असे आवाहन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. बाजार समितीतून जागर दिंडी पुढे दिंडोरीनाका, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, ओझररोडने निफाड, विंचूर व मराठवाड्याकडे रवाना झाली. जागरदिंडीच्या माध्यमातून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पत्रके वाटप करणार आहेत.प्रबोधन दिंडीत डॉ. उत्तम फरताळे, किशोर सांळुके, संजय गायकवाड, किरण आगाज, दीपक थोरे, भरत पाटील, सचिन हांडगे, सौरभ खेडेकर, प्रदीप देशमुख आदिंसह दिंडीसाठी मदत करणारे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)