शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाची जागा कमी पडण्याची आयोजकांना उपरती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST

नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनास केवळ ४-५ हजारांची उपस्थिती असेल, अशा भ्रमात राहून नियोजन करणाऱ्या आयोजकांना संमेलन दीड महिन्यांवर ...

नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनास केवळ ४-५ हजारांची उपस्थिती असेल, अशा भ्रमात राहून नियोजन करणाऱ्या आयोजकांना संमेलन दीड महिन्यांवर आल्यानंतर यापूर्वी निर्धारित केलेली गोएसोच्या इंजिनिअरिंग कॉलेजनजीकची जागा अपुरी पडणार असल्याची उपरती झाली. त्यामुळे अखेर गोएसो कॅम्पसमधील जिमखान्यानजीकच्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावरच संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा रंगणार आहे.

नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी स्थळ पाहणीकरिता साहित्य महामंडळाची स्थळदर्शन समिती जेव्हा नाशिकला आली होती, त्यावेळी प्रारंभी त्यांना प्रस्तावित इंजिनिअरिंग कॉलेजची जागा आणि आसपासचा परिसर दाखवण्यात आला. त्यांनी फारसा विचार न करता या स्थळाला मंजुरीदेखील दिली. मात्र, अनेक संमेलनांना गेलेल्या मान्यवरांनी नाशिकमधील गोएसोच्या इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील मैदान कमी पडणार असल्याचे संमेलनाच्या स्थळ निश्चितीपासून आयोजकांना सांगितले होते. मात्र, संमेलन पदरात पडल्याच्या आनंदातच मश्गूल असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. तसेच स्थळ निश्चितीपूर्वीच गोएसो कॅम्पसमधील क्रिकेट मैदान संमेलनासाठी दिले जाणार नसल्याचे डॉ. मो.स. गोसावी तसेच शैलेश गोसावी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा त्याबाबत विचारणा करण्याचीही आयोजकांना धास्ती वाटत होती. मात्र, जागेबाबतच्या चर्चेची कुणकुण स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या कानापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी जागा अपुरी पडल्यास नाचक्की होणार असल्याने तत्काळ गोएसोच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास लोकहितवादी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्या मैदानावर मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्वनियोजित क्रिकेट सामने असल्याने उर्वरित आठवडाभराच्या कालावधीत स्टेजसह अन्य सुविधा कशा उभारायच्या हा देखील पेच होता. परंतु, संमेलनस्थळ अपुरे पडल्यास सारेच नियोजन फसणार असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर डॉ. गोसावी सरांनी मार्चच्या मध्यानंतर मैदान वापरास परवानगी दिल्याचे समजते. मात्र, मैदानाची किमान नासधूस होईल, याबाबत दक्षता घेण्याची सूचना देखील देण्यात आली.

इन्फो---

पार्किंगसाठीही अतिरिक्त जागांसाठी प्रयास

गोएसो कॅम्पसमधील मुख्य क्रिकेट मैदानात सर्वाधिक गर्दीचा उद्घाटन सोहळा क्रिकेट मैदानावर होण्याचे निश्चित झाल्याने गर्दी आणि त्याचबरोबर वाहनांची संख्यादेखील हजारो राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संमेलनासाठी येणाऱ्या हजारो रसिकांच्या पार्किंगसाठी गोएसो कॅम्पसबाहेरील मोकळ्या जागा, पटांगणे, ओपन प्लॉट शोधण्यासदेखील प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोगो

शुक्रवारी मुख्य अंकात प्रसिद्ध झालेला संमेलनाचा लोगोच वापरावा.