शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर

By admin | Updated: July 7, 2017 18:13 IST

मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी बेकायदेशीर

नाशिक : मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी बेकायदेशीर असून, त्यांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये केलेली कृतीदेखील कायदेशीर नसल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले असून, शिर्के यांच्याविरुद्ध बेकायदेशीर पाटी लावल्याबद्दल छावणी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. मालेगावातील संगमेश्वर भागात मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला केल्याच्या कारणावरून छावणी पोलीस ठाण्यात तन्वीरखान खलीलखान यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मालेगाव येथे काही व्यक्ती गायींची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून गोवंश संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक व क्लीनर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गोवंश संरक्षण समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून शिर्के यांच्यावर हल्ला करण्यात आल्याच्या या घटनेने मालेगावातील वातावरण तप्त झाले होते. शिर्के यांना मारहाण करणारा प्रमुख संशयित तन्वीरखान याचा मालेगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता; मात्र हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी कायदेशीर आहे किंवा कसे याबाबत सरकारने शहानिशा करावी तसेच पाटी लावणे बेकायदेशीर असेल तर पोलिसांनी त्यावर काय कार्यवाही केली याचा खुलासा करावा, अशी सूचना सरकारला केली होती.