शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणकाद्वारे तब्बल २३ वर्षांपूर्वी १९९७मध्ये वाहन नोंदणी व अनुज्ञप्तीबाबतचे काम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला ...

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणकाद्वारे तब्बल २३ वर्षांपूर्वी १९९७मध्ये वाहन नोंदणी व अनुज्ञप्तीबाबतचे काम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला टूल्स ऑफलाइन प्रणाली माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली होती.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत १७ लाख ८४ हजार ७६४ वाहनांचे अभिलेखे संगणकीकृत केले आहेत, तर १ लाख २० हजार ९९५ अनुज्ञप्ती काम करण्यात आलेले आहे. या कार्यालयाने २००३ पासून संगणक प्रणालीवर चाचणीला सुरुवात केली होती. त्यानंतर शासनाने राज्यभरात सदर प्रणालीद्वारे अपॉईंटमेंट सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर चाचणी घेण्यास प्रारंभ केला. या संगणक प्रणालीद्वारे जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जवळपास १ लाख ८ हजार ६०४ चाचण्या घेतल्या. त्यापैकी ८९ हजार ३२९ अर्जदार उत्तीर्ण झाले. देशात सर्वप्रथम आणि यशस्वी असा राबविण्यात आलेला प्रकल्प स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र असून, ऑक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०२० या पाच वर्षांच्या काळात १ लाख ३८ हजार ९१९ वाहनांची तपासणी करण्यात आली आहेत. दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातात युवकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून पक्क्या अनुज्ञप्तीकामी अर्जदाराला प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे, तर कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून १ डिसेंबरपासून ऑनलाइन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इन्फो===

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पूर्णपणे डिजिटायझेशन झाले आहे, तर अनुज्ञप्ती वाहन नोंदणीसंबंधी ४० लाखापेक्षा अधिक डिजिटल नोंदणी झाली आहे. रस्ते सुरक्षा सप्ताह तसेच सुरक्षित वाहन चालविणे असे विविध उपक्रम कार्यालयामार्फत राबविण्यात येतात.

- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Attachments area