शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित, कमी दाबाने आणि बेभरवशाचा वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST

येवला : तालुक्यातील साताळी गावातील दलित-आदिवासीं वस्त्यांमध्ये येत्या ३१ ऑगस्टपर्यंत रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास, राष्ट्रसेवा दल प्रणित ...

येवला : तालुक्यातील साताळी गावातील दलित-आदिवासीं वस्त्यांमध्ये येत्या ३१ ऑगस्टपर्यंत रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास, राष्ट्रसेवा दल प्रणित शेतकरी पंचायतचे कार्यकर्ते १ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीच्या या कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे शेतकरी पंचायतीने दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील चिचोंडी, साताळी, भिंगारे, महालखेडा, नेऊरगाव, निमगाव मढ आदी गावांमध्ये महावितरणचा वीजपुरवठा अनियमित, कमी दाबाने आणि बेभरवशाचा वीजपुरवठा होत आहे. अचानक रोहित्र जळाल्यामुळे पंधरा दिवस वीजच नसल्याचा कटू अनुभव शेतकरी वर्षभरात अनेकदा घेत असतात. एरव्हीही पाच-पाच तास वीज गायब राहण्याचे प्रकार तर बऱ्याच वेळा शेतकरी सहन करतात. वरील गावांपैकी सर्वच गावांमध्ये कमीतकमी तीन ते चार डीपी नव्याने बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्या-त्या गावातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. मात्र, त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढली आहे. अर्थात, गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसानेही तब्बल महिन्याभराची ओढ दिल्यामुळे जेमतेम झालेल्या खरिपाच्या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विहिरींमध्ये थोडे-फार पाणी आहे. मात्र, वीज नसल्यामुळे ते पिकांना देता येत नाही, अशा विचित्र कोंडीत शेतकरी सापडला आहे.

मध्यंतरी महावितरणने शेतकऱ्यांचे मेळावे घेतले. दहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केला असून, सिंगल फेजही कट असल्याने साताळी गांव अंधारात आहे. शेतकरी वर्गाला या भयंकर परिस्थितीत दिलासा देण्यासाठी किमान आता कट केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रसेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनात ग्रामपंचायत सरपंच सुनंदा पुंजाराम काळे, माजी सरपंच मच्छींद्र काळे, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब कोकाटे, दिलीपराव काळे, भिकाभाऊ सोनावणे, पंढरीनाथ काळे, भाऊसाहेब जगताप, उपसरपंच गणेश कोकाटे, सुखदेव काळे आदी सहभागी होणार आहेत.