शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन नाशिकसाठी निमंत्रण

By admin | Updated: April 6, 2017 02:00 IST

सातपूर : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले

 सातपूर : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले असून, या उपक्र मासाठी योग्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्र माचे नेहरू सेंटर येथे ३० व ३१ मे रोजी आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्र माचे उद्घाटन करण्यात येणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी दिली. निमाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस उदय खरोटे, अनिल बाविस्कर आदिंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे. गेल्या पंधरा ते वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने नाशिकचा औद्योगिक विकास खुंटला आहे. विदर्भ मराठवाड्याला वीजदरात सवलत दिल्याने नाशिकच्या उद्योजकांवर अन्याय झाला आहे. म्हणून नाशिकला मोठा उद्योग प्रकल्प मिळावा, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा, दिंडोरीला दोन वर्षांपासून चारशे हेक्टर जागा संपादित केली असली तरी अद्याप प्लॉटिंग झालेले नाही, अशा अनेक समस्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी निमा, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुंबईला मेक इन नाशिक हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्र मांतर्गत मुंबईतील मोठ्या उद्योगांशी, मर्चंट्स एक्स्पोर्ट्स, विविध देशांचे दूतावास यांच्याशी संवाद साधून नाशिकच्या विकासाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्र माला जिल्हा प्रशासनाचे शासकीय स्तरावर सर्व सहकार्य लाभणार आहे. (वार्ताहर)