शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ओडिसातील मायक्रो फायनान्सकडून गुंतवणूकदारांची फसवणूक

By admin | Updated: January 14, 2015 23:54 IST

सत्तर ते ऐंशी लाखांची गुंतवणूक : भद्रकाली पोलिसांना निवेदन

नाशिक : केबीसी, विकल्प या पाठोपाठ आता ओडिसा येथील मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदार व ठेवीदारांना विविध ठेव योजनांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ या फसवणुकीबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार व ठेवीदारांनी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना निवेदन दिले आहे़ कंपनीने देशभरातील विविध शाखांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जुलै २०१४ मध्ये कंपनीचा परवाना रद्द केला आहे़भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिराजवळील एकसत्य कॉम्प्लेक्समध्ये गेल्या तीन वर्षांपासून मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय होते़ कंपनीचे मुख्य कार्यालय अन्नपूर्णा, प्लॉट क्रमांक ६८ (पी), रसूलगढ, भुवनेश्वर, ओडिसा येथे असून, नाशिकमधील कार्यालय गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ हातमजूर, कामगार यांसह नागरिकांनी कंपनीच्या आवर्तक ठेव योजना, मुदत ठेव योजना, मासिक ठेव योजनेमध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे़देशभरात वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग उभारले जात असल्याची माहिती कंपनीकडून गुंतवणूकदारांना देण्यात आली होती़ त्यामध्ये मायक्र ो कन्स्ट्रक्शन, मायक्रो हॉस्पिटल, मायक्रो फिल्म अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, मायक्रो लिजिंग अ‍ॅण्ड फंडिंग, एमबीसी टीव्ही चॅनल यामध्ये कंपनीने केलेल्या गुंतवणूक व कंपनीचा गैरकारभार यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ३ जुलै २०१४ रोजी परवाना रद्द केला आहे़ कंपनीचे कार्यालय बंद असल्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सीबीआय चौकशी, महाव्यवस्थापकाला अटक, चौकशी झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उत्तरे दिली जातात़ या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदार व ठेवीदारांना दिल्या जात असलेल्या उत्तरांमुळे ते हवालदिल झाले आहेत़ कंपनीने शहरातील अनेक नागरिकांकडून पैसे जमा करून त्यांना गंडा घातला असून, कार्यालयही बंद केले आहे़त्यामुळे कंपनीने फसवणूक केल्याचे दिसत असून, या कंपनीवर कारवाई करून पैसे मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणूकदारांनी भद्रकाली पोलिसांना दिले. (प्रतिनिधी)