शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत २१ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील इच्छुक जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याचे चित्र आहे. कॉँग्रेसमधील काही इच्छुकांनी गटागटाने मोर्चेबांधणी केली असून, गटातील कोणा एकालाही उमेदवारी मिळाली तरी चालेल. मात्र उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा लकडा पक्षश्रेष्ठींकडे लावण्यास सुरुवात झाली आहे.जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकारी व सदस्यांनी भेट घेतली असता त्यांना २१ सप्टेंबरला विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षाची मुदत संपुष्टात येत असून, निवडणुका होतील की नाही, याबाबत विचारणा केल्याचे कळते. त्यात ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी निवडणुका विहित कार्यकाळातच होतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यांच्या आशा उंचावल्या असून, दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी गटागटाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसकडून उपाध्यक्ष पदासाठी इगतपुरी, सिन्नर, नाशिक व बागलाणमधील इच्छुक सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राष्ट्रवादीतूनही इगतपुरी, बागलाण, दिंडोरी व येवला तालुक्यांतील इच्छुकांनी अन्य पक्षांतील सदस्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)