शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा शिक्षक बदल्यांवरून गोंधळ : दोन परस्पर शासन निर्णय

By admin | Updated: May 23, 2017 22:08 IST

आंतरजिल्हा बदल्यांबाबत दोन परस्पर विरोधी शासन निर्णयाने शिक्षण विभागाचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांची कार्यवाही होणार असतानाच ३१ डिसेंबर २०१६ पूर्वीच्या परस्पर व आपसी आंतरजिल्हा बदल्यांबाबत दोन परस्पर विरोधी शासन निर्णयाने शिक्षण विभागाचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात तातडीने शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन डझनभर प्राथमिक शिक्षकांच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे बदल्यांचे प्रस्ताव पडून आहेत. या शिक्षकांनी मंगळवारी (दि.२३) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन शासन निर्णयानुसार ना हरकत दाखला देण्याची मागणी केली. २९ सप्टेंबर २०११ चा शासन निर्णय व १६ डिसेंबर २०१६ चे परिपत्रक याचा आधार या शिक्षकांनी घेतला. मात्र २९ सप्टेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही करताना संबंधित दोन्ही जिल्हा परिषदेकडून संबंधित शिक्षकांना ना हरकत प्रमाणपत्र दिले पाहिजे. अशाच शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही ३१ डिसेंबरनंतर करण्यात यावी. प्रत्यक्षात १३ डिसेंबरला झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यापुढे कोणत्याही शिक्षकांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे आदेश दिले होते.