शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या अधांतरी

By admin | Updated: August 27, 2016 00:13 IST

शिक्षण सभापती संतप्त : पालघर, कोल्हापूरच्या शिक्षकांची दांडी

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे दीडशे शिक्षकांच्या बदल्या अधांतरी सापडल्या आहेत. शिक्षण सभापती किरण थोरे यांनी या बदल्यांचे आदेश तत्काळ रद्द करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.पालघर येथील ४३ व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ५० शिक्षकांना त्या त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाशिकला बदली होऊनही सोडलेले नाही. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेच्या २०० पैकी केवळ ६५ शिक्षकच नाशिकला हजर होऊ शकले आहेत. तिकडे बुधवारी मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांबाबतच्या बैठकीत नाशिक मधून अन्यत्र आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीबाबत चर्चा झाली. शिक्षण विभागाची आस्थापनेची जबाबदारी असलेले उपशिक्षणाधिकारी ए.जे. सोनवणे यांनी ११ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. ही माहिती समजताच संतप्त झालेल्या सभापती थोरे यांनी सोनवणे यांना बोलावून त्यांची कान उघडणी केल्याचे समजते.