शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी लॉकडाऊननंतर तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

नाशिक : राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास लॉकडाऊन संपल्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोेलनाचा भडका उडेल, असा इशारा ...

नाशिक : राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास लॉकडाऊन संपल्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोेलनाचा भडका उडेल, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये सोमवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत दिला.

सर्वाेच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी बोलताना विनायक मेेटे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आता पोपटपंची नव्हे, तर गांभीर्यपूर्वक कृतीची आ‌वश्यकता असून, सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्यपालांमार्फत केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा आणि केंद्रीय आयोगाने हा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठविल्यानंतर शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन परिस्थिती मांडावी. एखाद्या समाजास आरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मात्र, त्यास मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही, असे न्यायालयाने म्हटल्याचे त्यांनी नमूद करताना निकालपत्रात अनेक विरोधाभास दिसत असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षण सुनावणीकडे राज्य सरकारचे लक्ष नव्हते. वकील आणि याचिकाकर्त्यांमध्ये समन्वय नव्हता. कागदपत्र वेळेवर न्यायालयात पोहोचली नाहीत. न्यायालयास अर्धवट माहिती दिली गेली. तसेच गायकवाड अहवालाचे भाषांतर करून न्यायालयासमोर मांडले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या सगळ्याला आघाडी सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जबाबदार असून, त्यांनी ताबडतोब अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्याचप्रमाणे, न्यायालयाच्या निकालाचा बारकाईने अभ्यास करून नवीन मार्ग काढण्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञांची समिती स्थापन करावी. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजास तत्काळ इडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे. आरक्षण रद्दच्या निर्णयापूर्वीची नोकरभरती तत्काळ पूर्ण करून नियुक्त्या द्याव्यात. आरक्षण नसल्याने आता मराठा समजाला ओबीसीप्रमाणे सवलती लागू कराव्यात, अशी मागणी मेटे यांनी केली.