शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

युतीच्या निर्णयामुळे इच्छुकांची ‘घालमेल’

By admin | Updated: October 29, 2016 00:40 IST

युतीच्या निर्णयामुळे इच्छुकांची ‘घालमेल’

नाशिक : आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पक्षांकडील ‘इनकमिंग’ थांबण्याची भीती असून, नगरपालिकांमध्ये दोन्ही राजकीय पक्षांची ऐनवेळी तिकीट वाटपाची धांदल उडाल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर ही युती महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये कायम राहिल्यास शिवसेना व भाजपामधील इच्छुकांची घालमेल वाढणार असल्याचे बोलले जाते.  आजवर स्वबळाच्या हिशेबाने भाजपा व शिवसेनेने तयारी सुरू केलेली असतानाच अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शिवसेना - भाजपाने युती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून जाहीर होताच अनेकांची नगरपालिकांसाठी रातोरात उमेदवारी रद्द झाल्याची चर्चा आहे. आता दोन्हीकडील इच्छुकांची संख्या आणि मर्यादित जागा पाहता युतीमधून उमेदवारी न मिळालेले आणि कुंपणावर असलेले आघाडीकडे तिकिटासाठी जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेही जिल्ह्णात राजकीय पक्षांव्यतिरिक्त निफाड व देवळा तालुक्यात जिल्हा विकास आघाडीचे ‘पेव’ फुटले असून, या युती आणि आघाडीच्या निर्णयामुळे तिकीट न मिळालेले इच्छुक जिल्हा विकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्णातील ७३ जिल्हा परिषद गट आणि १७६ पंचायत समिती गणांसाठी शिवसेना भाजपा युती झाल्यास अनेक इच्छुकांचे निवडणुकीआधीच पत्ते कापले जाणार आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही पक्षांना बंडखोरीची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच नाशिक, निफाड, सिन्नर, मालेगाव, नांदगाव, बागलाण येथील शिवसेना व भाजपाकडून इच्छुकांची जिल्हा परिषद गटांसाठी आधीच भाऊगर्दी वाढलेली आहे. अजूनही काही आजी-माजी सदस्य शिवसेना व भाजपाच्या वाटेवर आहेत. (प्रतिनिधी)