शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ‘नगररचना’त अपुरे मनुष्यबळ

By admin | Updated: March 17, 2017 00:04 IST

प्रकरणे प्रलंबित : विकास नियमावलीमुळे वाढणार ताण

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात अपुऱ्या मनुष्यबळामुळे बांधकामविषयक प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असून, येत्या काही दिवसांत राज्य शासनाने प्रसिद्ध केलेला शहर विकास आराखडा आणि शहर विकास नियंत्रण नियमावलीमुळे बांधकाम परवानग्यांसाठीही अर्जांचा डोंगर वाढण्याची शक्यता आहे. प्रकरणे मंजुरीसाठी विलंब लागत असल्याने बांधकाम व्यवसायावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.महापालिकेच्या नगररचना विभागात सद्यस्थितीत सुमारे ३५ अभियंत्यांचा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात ‘कपाट’ प्रकरणामुळे बांधकाम व्यवसाय सुस्त होता. माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या कारकीर्दीत महापालिकेत एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. त्यात नगररचना विभागाचाही समावेश होता. नगररचना विभागात तीन ते पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांना हलविण्यात आले होते. मात्र, बदली अभियंत्यांची संख्या कमी प्रमाणात देण्यात आली होती. सद्यस्थितीत नगररचना विभागात सुमारे २० अभियंत्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. परंतु, नगररचना विभागाकडे विविध प्रकरणांसंबंधीचा वाढता ताण लक्षात घेता मनुष्यबळ अपुरे पडत आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर बांधकामविषयक प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्य शासनाने शहर विकास आराखडा भागश: तसेच शहर विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली आहे. शहर विकास नियंत्रण नियमावलीतील काही तरतुदींबाबत अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. मात्र, येत्या सोमवारी (दि.२०) आयुक्तांनी क्रेडाईसह बांधकामाशी निगडित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले असल्याने त्यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या अहवालानंतर शासनाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, नव्या नियमावलीनुसार बांधकाम परवानग्यांसंबंधी अर्जांचा ओघ सुरू होणार आहे. अशावेळी नगररचना विभागात अपुरे मनुष्यबळाच्या माध्यमातून प्रकरणांना विलंब लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगररचना विभागात तातडीने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)