शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मानूरच्या कोविड सेंटरमध्ये अपुरे मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

कळवण शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अभोणा व मानूर येथे कोविड सेंटर कार्यरत करत तेथे रुग्णांवर ...

कळवण शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अभोणा व मानूर येथे कोविड सेंटर कार्यरत करत तेथे रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र याठिकाणी बेडची संख्या कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. मानूर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले. सध्या तेथे ३२ ऑक्सिजन बेड असून उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्यासह चौघे वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात काम बघत आहेत. मात्र आवश्यक असलेले कायमस्वरूपी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी तालुका नोडल अधिकारी असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा शासनस्तरावरील यंत्रणेकडे पाठपुरावा कमी पडत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कळवण तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे तेथे आवश्यक असलेले मनुष्यबळ कमी पडू लागले आहे.

तालुका नोडल अधिकाऱ्यांनी वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येवरून डीसीएचसी सेंटरसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे आवश्यक मनुष्यबळ,साहित्य, वाहन व्यवस्थेची तातडीने मागणी करुन व्यवस्थापन नियोजन करणे गरजेचे आणि आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता रुग्ण संख्या वाढल्यानंतर एप्रिल महिन्यात वरिष्ठ यंत्रणेकडे पत्रव्यवहार करण्याची धावाधाव होत आहे. याठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरचे रोज पुनर्भरण करावे लागते त्यामुळे तेथे वाहन व्यवस्थेची गरज असून भीषक, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,औषध निर्माण अधिकारी, ई. सी. जी तंत्रज्ञ, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, हॉस्पिटल मॅनेजर, कक्ष सेवक, सफाईगार, सुरक्षारक्षक आदी मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.

इन्फो

रुग्णसंख्या वाढीनंतर धावाधाव

वैद्यकीय मनुष्यबळ यंत्रणा अपूर्ण पडत असल्याची ओरड एकीकडे लोकप्रतिनिधी करीत आहेत तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेचा पाठपुरावा कमी पडत असल्याची ओरड वरिष्ठ यंत्रणा करीत असल्यामुळे बाधित रुग्णाच्या जीवाशी आरोग्य यंत्रणा खेळ खेळत असल्याचा आरोप होत आहे. कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळाचे योग्य प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु रुग्णसंख्या वाढल्यानंतर आता पळापळ सुरू झाली आहे.