शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या पळवापळवीला जोर

By admin | Updated: September 5, 2014 00:34 IST

नगरसेवकांच्या पळवापळवीला जोर

नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पळवापळवीला जोर आला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष सावध भूमिका घेत आहेत. मनसेच्या नगरसेवकांची राज ठाकरे यांनी हजेरी घेतली खरी; परंतु दोन नगरसेवक गैरहजरच होते. महापौर मनसेचाच होणार त्यामुळे इकडे-तिकडे जाऊ नका, असे राज यांनी बजावल्यानंतर सहल अहमदाबाद येथे रवाना झाली. दुसरीकडे मनसेसह अन्य पक्षांनी अन्य नगरसेवक गळाला लावण्याची तयारी केली आहे, तर कॉँग्रेसनेदेखील सर्व नगरसेवकांची खातरजमा केल्यानंतर कोणीही नगरसेवक अन्य पक्षाच्या गळाला लागला नसल्याचा दावा केला आहे.महापौरपदाच्या निवडणुकीसाठी झपाट्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन नगरसेवक सेनेच्या गळाला लागल्याचे कळाल्यानंतर काल रात्री मनसेचे नगरसेवक मुंबईला पाठविण्यात आले. शहापूरजवळ मुक्काम केल्यानंतर हे सर्व नगरसेवक दुपारी राज ठाकरे यांना भेटले. यावेळी नीलेश शेलार आणि शोभा शिंदे हे मुंबईत थेट राज ठाकरे यांना भेटण्यास येऊ असे सांगूनही प्रत्यक्षात आलेच नाही. सुजाता डेरे या आजारी असल्याने त्या अनुपस्थित होत्या. भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरू असून, कुठल्याही परिस्थितीत महापौर मनसेचाच होईल, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी महापौर होण्यासाठी थेट जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली आहे. त्यानंतर मनसेचे नगरसेवक गुजरातला रवाना झाले. दरम्यान, शिवसेनेत सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, त्यासाठी विधानसभेच्या दोन इच्छुकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे अन्य पक्षांतील काही नगरसेवक फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सेनेकडून सुरू आहेत. दरम्यान, कॉँग्रेस नगरसेवकांची बैठक गुरुवारी पक्षाचे गटनेता उत्तमराव कांबळे यांच्या दालनात झाली. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, पक्ष प्रवक्ता हेमलता पाटील बैठकीस उपस्थित होते. कॉँग्रेसचे जे दोन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा होती त्यापैकी एकजण बैठकीस उपस्थित होता, तर दुसऱ्या नगरसेवकाशी संपर्क झाला आहे. पक्षाच्या बैठकीला काही नगरसेवक विविध कारणांमुळे उपस्थित नसले तरी त्यांनी पक्षाला तसे कळविले असल्याचे सांगण्यात आले. देशात आणि राज्यात आघाडी असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राहण्याचे ठरविण्यात आले. तथापि, गेल्या वेळेप्रमाणे राष्ट्रवादीने बहिष्कार घालू नये, अशी अट असेल तरच आघाडी करावी, असे ठरविण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादीचे गटनेता प्रा. कविता कर्डक, शहराध्यक्ष अर्जुन टिळे आणि माजी गटनेता विनायक खैरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यांना तसे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)आघाडीतील इच्छुक तयारीतकॉँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत ठरल्यानंतर महापौर-पदासाठी शाहू खैरे आणि उपमहापौरपदासाठी राहुल दिवे इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादीकडून विनायक खैरे, तसेच विक्रांत मते इच्छुक आहेत. राष्ट्रवादीची सदस्य संख्या अधिक असल्याने राष्ट्रवादीला प्राधान्यक्रम देण्याचे ठरविण्यात आले. यासंदर्भात रात्री उशिरा कॉँग्रेस गटनेता उत्तमराव कांबळे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती.नाशिक : राज ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याने महापौरपदाच्या निवडणुकीबाबत मनसे नगरसेवकांनी निश्चिंत राहावे, असे स्पष्ट केले असताना दुसरीकडे भाजपा सेनेशी चर्चा करीत असल्याने स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थात, महापौर निवडणुकीसाठी सेना, भाजपा आणि मनसे अशी आघाडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे मनसेने नगरसेवक सेनेने फोडल्याने ते एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.