शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: May 6, 2014 22:02 IST

वसंत मार्केट चौफु लीवरील अपघात : एक जण गंभीर

वसंत मार्केट चौफु लीवरील अपघात : एक जण गंभीरनाशिक : व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयाकडून दुचाकीवर जाणार्‍या दोघांना सोमवारी रात्री भरधाव इनोव्हाने दिलेल्या धडकेत गंगापूर नाक्यावरील तरुण ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे़ या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना गंगापूर नाका परिसरात राहणारे जयेश वसंत थेटे (२१) आणि त्याचा मित्र सुमित निरंजन इंगळे हे दोघे सोमवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, सीजी-७४७) व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयाकडून मॅग्नम हॉस्पिटलकडे जात होते़ वसंत मार्केटजवळील चौफुली क्रॉस करीत असतानाच कॅनडा कॉर्नरकडून भरधाव आलेल्या इनोव्हा कारने (एमएच १५, सीटी-६५६७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़कारची धडक इतकी जोरात होती की दुचाकी चालविणारा जयेश थेटे हा कारच्या दरवाजावर जोरात आदळला. त्यापाठोपाठ पाठीमागे बसलेला सुमित इंगळे हाही खाली पडला़ या दोघांनाही जवळच्याच मॅग्नम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉ़ प्रवीण गारे यांनी जयेशला मयत घोषित केले, तर सुमित इंगळेवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघातात इनोव्हा चालकही जखमी झाला असून, त्याच्यावरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघाताची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)