शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर महागाईचे सावट

By admin | Updated: August 15, 2014 00:34 IST

पोळा सणावर महागाईचे सावट

पोळा सणावर महागाईचे सावट येवला : पोळा सण शेतकरीवर्ग उत्साहाने साजरा करत असतात. यावर्षी सोमवारी (दि. २५) पोळा सण साजरा होणार आहे. त्याची तयारी ग्रामीण भागात एव्हाना सुरू झाली असून, ग्रामीण भागात कुंभार बांधवांची मातीचे बैल बनवण्याची एकच लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, यंदा सणावर महागाईचे सावट आहे.ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातसुद्धा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. येवल्याच्या मानाच्या बैलजोडीचा मान परंपरेने माणिकराव शिंदे पाटील यांच्या बैलजोडीचा असतो. शहरातून या बैलजोडीची मिरवणूक काढली जाते. शेतातल्या बैलांबरोबर मातीच्या बैलांचेदेखील पूजन घराघरात केले जाते. परंतु या वर्षी बळीराजाला मातीच्याच बैलांची पूजा करण्याची वेळ येणार आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे चारावर्गीय पिकांचे झालेले नुकसान होय. त्यानंतर चालू हंगामात लांबलेल्या पावसामुळे जनावरांना चाऱ्याची कमतरता व महागाई यामुळे ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी जीवा-शिवाची बैल जोड विकून यांत्रिक मशागतीने शेती उभी केली आहे.येवल्याच्या ग्रामीण भागात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के बैलांची संख्या घटली आहे. त्यामुळे यावर्षी पोळा सणावर महागाईचे सावट राहणार आहे. असे असले तरी मातीच्या बैलांच्या पूजेला शहरासह ग्रामीण भागातदेखील महत्त्व आहे. म्हणूनच १० ते १५ दिवस आधी येवल्याच्या ग्रामीण भागात मातीचे बैल बनवण्याचे काम सुरू असते. मातीच्या बैलांच्या जोडीची ंिकंमत अंदाजे १० ते २० रुपये आहे. मंगळवारी आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणल्याचे चित्र होते. (वार्ताहर)