शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

‘गणराया’वर विघ्न महागाईचे

By admin | Updated: June 26, 2014 01:01 IST

‘गणराया’वर विघ्न महागाईचे

 नाशिक : येत्या आॅगस्ट महिन्यात सर्वत्र साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा महागाईचे संकट असून, ‘इको फे्रण्डली’ अर्थात शाडू माती व नैसर्गिक रंगकाम केलेल्या गणेशमूर्ती खरेदी करताना नागरिकांना महागाईच्या विघ्नाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतींमध्येदेखील दहा ते पंधरा टक्क्यांनी भाववाढ होऊ शकते, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.विविध सण-उत्सव पर्यावरणपूरक साजरे केले जावे यासाठी शाळा, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी संघटनांकडून जागर केला जातो. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दिवाळी, गणेशोत्सवासारखे सणदेखील इको फ्रेण्डली पद्धतीने साजरे करण्यावर नाशिककर भर देत आहेत. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांपासून शहरात होणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. गणेशोत्सवामध्येदेखील पर्यावरण संवर्धन करण्याचा नाशिककरांनी गेल्या वर्षी पुरेपूर प्रयत्न केल्याचे दान झालेल्या मूर्तींच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे गोदाप्रदूषणदेखील कमी होण्यास मदत झाली. परिणामी जलचर प्राणी, वनस्पती यांची सुरक्षितता धोक्यात आली नाही. यावर्षी गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या शाडू मातीचा वाहतुकीचा खर्च व त्यावर लागणारा सरकारी कर लक्षात घेता विक्रेत्यांकडून भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून, आठवडाभरानंतर तयार झालेल्या गणेशमूर्तींवर रंगकाम करण्यास प्रारंभ केला जाणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. (प्रतिनिधी)