शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात उद्योग व्यवसायाला सवलती मिळाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरतर्फे आयोजित ‘अर्थसंकल्प २०२१ आशा आणि अपेक्षा’ कार्यशाळेत ते बोलत होते. सनदी लेखापाल ...

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरतर्फे आयोजित ‘अर्थसंकल्प २०२१ आशा आणि अपेक्षा’ कार्यशाळेत ते बोलत होते. सनदी लेखापाल उमेश शर्मा आणि चेतन डागा यांनी अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर या विषयीच्या अर्थसंकल्पातील अपेक्षा, यावर आपले विचार मांडले. डागा यांनी सांगितले की, कधी-कधी व्यवसायाच्या बाबतीत दुहेरी कर आकारणी केली जाते, असे म्हणणे हे चुकीचे आहे. भागीदारी संस्थेला उत्पन्नावरील प्राप्तिकराचे दर ५ टक्क्यांनी कमी करण्यात यावे व कलम ८० सी खालील गुंतवणूक मर्यादा वाढवून त्याची वजावटीची रक्कम वाढवावी. परताव्यावरील व्याजाचे दर वाढविण्यात हरकत नाही, असे सांगितले.

शर्मा यांनी सांगितले की, वस्तुसेवा करातील क्लिष्ट तरतुदी कमी करून इनपुट क्रेडिट सुलभतेने मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी स्वागत करून व्यवसायाला उभारी देण्याचे प्रयत्न या अर्थसंकल्पात असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाचे विभाग जेव्हा उद्योजकांकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतात, तेव्हा त्यावरील वस्तुसेवा कर उद्योजकाला लगतच्या महिन्यात शासनाच्याच खजिन्यात भरावा लागतो, परंतु शासनाकडून मिळणारी रक्कम यायला कमीतकमी तीन महिने लागतात. मग कराची ही रक्कम मोबदल्याच्या रकमेतून परस्पर वळती (कर उत्पन्न स्रोतातून वजा) करण्यासारखी तरतूद आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्तविक, चेंबरचे कर समितीचे सहअध्यक्ष सीए अशोककुमार पगारिया यांनी केले. वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार मानले. यावेळी सागर नागरे, अनिलकुमार लोढा, उमेश दशरथी, शुभांगी तिरोडकर, विनी दत्ता यासह कार्यकारिणी सदस्य आणि कर सल्लागार उपस्थित होते.