शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

इन्सानियत ही हैं धर्म वतन का...

By admin | Updated: May 25, 2017 01:17 IST

नाशिक : दहशतवादाची अनामिक भीती, गोळीबाराचे आवाज आणि केव्हाही सुरू होणारी दगडफेक... अंगावर शहारे आणणारे हे चित्र काश्मिरेतर नागरिकांच्या मनामनात ठासलेले..

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहशतवादाची अनामिक भीती, गोळीबाराचे आवाज आणि केव्हाही सुरू होणारी दगडफेक... अंगावर शहारे आणणारे हे चित्र काश्मिरेतर नागरिकांच्या मनामनात ठासलेले... परंतु तेथे सारे चित्रच वेगळे... बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत वसलेल्या गावांतील गावकरी वेगळे, अतिथ्यशील आणि माणुसकीला जपणारे महत्त्वाचे म्हणजे याच आपल्याच मुल्काला देश मानणारे... सेवा धर्माचे पालन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या वैद्यकीय व्यावसायिकांना ही ‘इन्सानियत’ दिसली. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये गेलेल्या अकरा वैद्यकीय पथकाला हा अनुभव आला. धुमसत्या काश्मीरात आपल्याच देशबांधवांकडून मायेचा ओलावा निर्माण करावा यासाठी या संस्थेच्या माध्यमातून अशाप्रकारचे प्रयत्न केले जातात. काश्मीरच्या विविध भागांत अगदी पाकिस्तानच्या जवळ असलेल्या भूभागापर्यंत जेथे दुबळी सरकारी यंत्रणा पोहोचत नाही, तेथे देशाच्या अन्य भागातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याची आणि पर्यायाने देशाच्या अन्य भागातील नागरिक आपल्या बरोबरच आहेत याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने एक वैद्यकीय पथक १० ते २० मे च्या दरम्यान जाऊन आले. यात वणी येथील डॉ. मधुकर आचार्य, डॉ. अस्मिता आचार्य, डॉ. रामदास भोई व डॉ. सुवर्णा भोई, डॉ. सुदेश बोरा व डॉ. रोशनी बोरा, डॉ. सतीश भांबरे, जळगाव येथील डॉ. धर्मेंद्र पाटील तसेच बॉर्डरलेस फाउंडेशनचे ऋषिकेश परमार यांचा प्रामुख्याने यात समावेश होता. तेथील वसतिगृहात राहणे आणि ग्रामस्थांबरोबरच नाश्ता, भोजन करताना या पथकाने तेथील अंतरंग जाणून घेतल्यानंतर त्यांना काश्मीर बाहेर भासवले जाणारे हे चित्रच चुकीचे असल्याचे दिसले. देशाशी निष्ठावान असलेले नागरिक बेरोजगारी आणि अल्प शिक्षणाने पीडित आहेत. पर्यटन हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने पर्यटनावर अवलंबून राहतात. त्यामुळेच येथे येणारे अन्य राज्यातील नागरिक आणि पर्यटकांना कधीही ते दुखावत नाहीत.  सैन्य किंवा स्थानिक पोलिसांच्या कारवाईला विरोध करणारे नागरिकही मोजकेच आहेत. अन्य नागरिकांना आता अशा घटनांची सवय झाली आहे. काश्मिरी नागरिक सेवेसाठी आलेल्या नागरिकांविषयी कृतज्ञताच व्यक्त करतात. त्यांनाही शांतता हवी असल्याचे मनही ते मोकळे करतात. अर्थात, सर्वच काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही तर काही ठिकाणी अतिरेक्यांना शोधण्यासाठी झालेली कारवाई आणि त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि सैन्यावर केलेली दगडफेक असे अनुभवही घेतले.