शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पदपथवर वाढते अपघात

By admin | Updated: November 7, 2016 00:55 IST

अतिक्रमणाने रस्त्यावर चालणे झाले मुश्कीले गायब

 नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व रस्त्यांना अतिक्रमणाचा वेढा पडला असून, दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तर सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. कारण जिकडे पहावे तिकडे टपऱ्या, हातगाड्या, पदपथावरच पथारी पसरून बसलेले विक्रेते यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सुमारे ५ ते १0 वर्षांच्या काळात शहरातील सर्व मुख्य रस्त्यालगत पेव्हरब्लॉक टाकून तयार करण्यात आलेले पदपथ तर गायबच झाले आहेत.नाशिक शहरातील वाढत्या वाहन व्यवस्थेला, रहदारीला आणि रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना शिस्त लागावी म्हणून मुंबई-पुणे या महानगराच्या धर्तीवर गेल्या दहा वर्षांत शहरातील मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग त्याचप्रमाणे सिडको-अंबड लिंक रोड, गंगापूररोड, पंचवटी भागातील मुख्य रस्ते, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मार्ग, नाशिकरोड, उपनगर आणि इंदिरानगर या मोठ्या वसाहतीतील रस्त्यांचे रूंदीकरण करून मध्यभागी दुभाजक टाकून दोन पदरी रस्ते तयार करण्यात आले. त्या दोन पदरी रस्त्यांच्या लगतच दोन्ही बाजूला सिमेंटचे पेव्हर ब्लॉक टाकून ठरावीक उंचीचे पदपथ तयार करण्यात आले. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महापालिका आणि राज्य शासनाच्या अन्य विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. परंतु सदर पदपथांवर सर्वप्रथम छोट्या टपरीधारकांनी आपले बस्तान मांडले. त्याचप्रमाणे लहानमोठे विक्रेतेही हे पदपथ जणू काही आपल्यासाठीच बांधले या थाटात तेथे व्यवसाय करू लागले. मग हळूहळू या सुंदर पदपथांची मोडतोड सुरू झाली. आपल्या छोट्या दुकानाच्या कनातीसाठी पेव्हरब्लॉकमध्ये खिळे ठोकणे, पेव्हरब्लॉकचा कठडा किंवा स्टूलसारखा उपयोग चहा विक्रेत्यांनी सुरू केला. त्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यालगतचे हे पथपद जणू काही गायबच झालेले दिसतात. आता तर वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून पायी चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. कारण त्यांच्या एकाकडेला दुकानाची रांग तर दुसरीकडे वेगाने जाणारी वाहने यामुळे अपघातात वाढच होत आहे.