शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ

By admin | Updated: August 14, 2016 00:32 IST

विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ

इगतपुरी : प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी बेलगाव कुऱ्हे : पावसाळ्यात पाण्यातून पसरणाऱ्या विषाणूजन्य, संसर्गजन्य आजारांमुळे इगतपुरी तालुक्यात विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. उपचारासाठी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी दिसत आहे.पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. यामुळे डासांची उत्पत्तीही वाढली आहे. डास चावल्याने अनेकांना थंडी, ताप, घसा खवखवणे, खोकला, कणकण, जुलाब अशा साथीच्या आजारांची लागण झालेली आहे. खासगी रु ग्णालयात उपचार महाग असल्याने शिवाय प्रत्येक गावागावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार होत असल्याने अनेक रुग्ण येथेच उपचार घेत आहेत. सध्याच्या वातावरणामुळे डास जास्तच वाढण्याचा संभव असून. यामुळे जीव घेणे आजार डेंगू, स्वाइन फ्लू, मलेरिया सदृश रुग्ण आढळून येण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या घरांमध्ये तसेच परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती स्वछता ठेवावी. आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, रांजण कोरडे करून तासभर सुकवून त्यानंतर पुनश्च पाणी भरावे. घराभोवती पाण्याच्या हौदात गप्पी मासे सोडावेत. घराच्या सभोवताली पाण्याचे डबके साचू देऊ नये, कुलरमधील व फ्रीजमधील पाणी नियमित बदलावे. परिसरात स्वछता ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही या दृष्टीने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)’