शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर-अंबड लिंकरोडवर गुन्हेगारीत झाली वाढ

By admin | Updated: September 20, 2016 00:41 IST

अवैध धंदे तेजीत : पोलीस चौकीची मागणी

सिडको : सातपूर-अंबड लिंकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून, अवैध धंदेदेखील वाढले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.सातपूर-अंबड लिंकरोड परिसरातील केवल पार्क येथे पोलीस चौकी उभारून चोवीस तास पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे महानगर समन्वयक दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून केवल पार्क, अष्टविनायकनगर, लक्ष्मण टाउनशिप या परिसरात भंगार बाजारातील टवाळखोरांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.येथील उद्यानात तसेच मोकळ्या जागेत मद्यपान, मारामाऱ्या करणे, तसेच गावठी बंदुकांचा धाक दाखविणे, तलवार, कोयते, लोखंडी रॉड अशा प्रकारच्या हत्यारांचा सर्रास वापर करणे, रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करण्याबरोबरच महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकारही घडत असल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेला अनधिकृत भंगार बाजारामुळेच याठिकाणी गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. पोलीस उपआयुक्तांना निवेदन देताना दिलीप दातीर, पंकज दातीर, गोरख घाटोळ, गोरख काळोगे, गिरीश ठाकरे, सागर जाधव, सिद्धेश घुमरे, विकास पाटील, रोहित खैरनार, यशवंत पवार, ज्ञानेश्वर काळे, किरण निगळ, योगेश जाधव, दीपक फडोळ, धनंजय निगळ, आकाश खर्जुल आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर) सातपूर-अंबड लिंकरोड परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार बाजारामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. येथील गुन्हेगार सर्रासपणे धारदार शस्त्रांचा तसेच बंदुकीचा धाक दाखवित असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर अवैध धंद्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच असल्याने याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने भंगार बाजार हटविण्याबरोबरच याठिकाणी त्वरित पोलीस चौकी उभारणे गरजेचे आहे.- दिलीप दातीर, महानगर समन्वयक, शिवसेना