शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बंदमुळे ‘पंचवटीकरांची’ गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 23:58 IST

नागरिकांनी केला पाण्याचा साठा : टँकरची व्यवस्था करण्याची मागणी

 पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याच्या कारणावरून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज संपूर्ण पंचवटी परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवल्याने पंचवटीकरांची गैरसोय झाली. नळाला पाणी आलेच नसल्याने नागरिकांनी जरा जपूनच पाणी वापरले. विशेष म्हणजे गुरुवारच्या दिवशी पंचवटीत पाणीपुरवठा होणार नसल्याने काही लोकप्रतिनिधींनी ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्याभागात बुधवारीच स्वखर्चाने पाण्याचे टॅँकर पाठविण्याची व्यवस्था केली होती. पंचवटीत संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी बुधवारच्या दिवशी घरातील हंडा, कळशी, मोठे पिंप, प्लास्टिक टब पाण्याने भरून ठेवले होते. पंचवटीतील हिरावाडीरोड तसेच हिरावाडी परिसरात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने हिरावाडीत गुरुवारी गुंजाळबाबानगर, भगवतीनगर व शिवकृपानगर या भागात खासगी टॅँकरने पाणीपुरवठा केल्याचे नगरसेवक रूची कुंभारकर यांनी सांगितले, तर हिरावाडीरोडवरील दामोदरनगर भागात बुधवारीच पाण्याचे टॅँकर पाठवून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिल्याचे नगरसेवक समाधान जाधव, रूपाली गावंड यांनी सांगितले. गुरुवारच्या दिवशी संपूर्ण पंचवटीत पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी जरा जपूनच वापरले. कामानिमित्ताने सकाळच्यावेळी घराबाहेर पडलेल्या नोकरदार गृिहणींची तसेच मोलमजुरांची गैरसोय निर्माण झाली होती. बुधवारीच पाण्याचा साठा करून ठेवला असला तरी दोन दिवस पाणी पुरविणे शक्य न झाल्याने काहींनी उसनवार म्हणून शेजारी राहणाऱ्यांकडूनही हंडाभर पिण्याचे पाणी घेतल्याचे बोलून दाखविले. (वार्ताहर)