शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रक्कम खात्यात जमा होणार असल्याने गैरसोय

By admin | Updated: July 1, 2017 00:52 IST

ताहाराबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील मुले, सर्व मुलींना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश देण्यात येतो.

लोकमत न्यूज नेटवर्कताहाराबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील मुले, सर्व मुलींना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश देण्यात येतो. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात रोख स्वरूपात रक्कम थेट बॅँक खात्यात दिली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यास त्याच्या पालकांसोबत संयुक्तपणे बॅँकेत खाते उघडण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. मात्र, काही बॅँकांच्या शाखांत झिरो बॅलन्स खाते उघडण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने चारशे रु पयांसाठी पाचशे रुपयांचे खाते उघडण्याची वेळ पालकांवर येऊन ठेपली आहे.  जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन गणवेश खरेदी करण्यासाठी प्रत्येकी २०० रुपये दिले जातात. परंतु योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांंच्या खात्यावर ही रक्कम दिली जाणार आहे.  राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी पत्र पाठवून शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी यांना दिल्या होत्या. परंतु प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे अद्यापही शाळा, केंद्रपातळीवर माहिती संकलनाचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळतील याबाबत सांगता येत नाही.  जिल्हा परिषद शाळेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांंच्या पालकांची बैठक बोलावून विद्यार्थी व पालकांच्या नावाने संयुक्त बॅँक खाते उघडण्याची माहिती शाळास्तरावरून देण्यात आली आहे. खाते उघडण्यासाठी आधारलिंक अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच जे नव्याने प्रवेश घेणार आहेत अशा पालकांनासुद्धा याबाबतीत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. अनेक पालक आता नव्याने खाते उघडण्यास तयार नाहीत.  याअगोदरच अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या नावासह संयुक्त खाते उघडले आहे. नवीन खाते राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, शेड्यूल बॅँकेत उघडण्याचे सूचित केले आहे. बॅँकांनी विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्सवर खाते द्यावे, असे आदेश आहेत. अनेक बॅँका झिरो बॅलेन्सवर खाते देत नसल्याची पालकांची तक्रार आहे. यामध्ये किमान पाचशे रुपये तरी ठेवावे, असे सांगण्यात येते. गतवर्षाप्रमाणे योजना ठेवावी२०१६-१७ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यात गणवेशाची रक्कम थेट जमा करण्यात आली होती. मुख्याध्यापक, शिक्षकांनी बचतगटांमार्फत गणवेश शिलाई केले. त्यामुळे बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळाले होते. काही पालक संयुक्त खाते उघडण्यास तयार नाहीत. त्यामुळे ही रक्कम खात्यात देणार तरी कशी, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. मागील वर्षीप्रमाणेच ही योजना ठेवावी, अशीही मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक करत आहेत.