शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कार व दुचाकीवरील इसमांनी दोन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना

By admin | Updated: November 10, 2014 00:53 IST

कार व दुचाकीवरील इसमांनी दोन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना

नाशिक : शिवाजीनगर येथील सराफ व्यावसायिकाच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत कार व दुचाकीवरील इसमांनी दोन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना शनिवारी रात्री घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील चव्हाणनगर येथे राहणारे मनोहर बाबूराव कुमावत (४२) यांचे शिवाजीनगरमध्ये सराफी दुकान आहे़ शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कुमावत आपल्या कारागिरासह सातपूर औद्योगिक वसाहतीतील स्नायडर कंपनीजवळून स्कूटरवर जात होते़ यावेळी पाठीमागून आलेल्या आयकॉन फोर्ड कारने (एमएच १२, व्हीव्ही-५७८६) व यामाहा दुचाकीने (एमएच १५ ईडी-५८७२) ने पाठीमागून जोरात धडक दिली़ या धडकेत कुमावत व त्यांचा कारागीर हे दोघेही खाली पडले़ यानंतर कार व दुचाकीवरील इसमांनी संगनमत करून चाकूचा धाक दाखवित कुमावत यांची दागिन्यांची बॅग लुटून नेली़ यामध्ये सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते़चोरट्यांना चोरून नेलेल्या बॅगेमध्ये ३० हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी २० ते २५ ग्रॅम वजन असलेल्या दोन किलो चांदीच्या व मिश्र धातूच्या १०० पट्ट्या, ३० हजार रुपये कि मतीचे प्रत्येकी १० ते ५० ग्रॅम वजन असलेले दोन किलो चांदीमिश्र धातूचे ७० नग जोडवे व अंगठ्या, एक लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ६० मणी, जुन्या दुरुस्तीच्या वस्तू, एक सोन्याची अंगठी, बुगडी, टॉप्स असे एकूण १५ ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण एक लाख ९२ हजारांचा ऐवज होता़या प्रकरणी सातपूर पोलिसांनी वैभव परदेशी, हेमंत भदाणे, धनराज पवार, किशोर सिरसाठ या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे़ (प्रतिनिधी)