शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी ४४ सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन

By admin | Updated: August 14, 2016 02:44 IST

स्वातंत्र्यदिनी ४४ सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन

 नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणून संशयितांना गजाआड करण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात सायबर फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला होता़या निर्णयानुसार राज्यातील पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक कार्यालये अशा एकूण ४४ ठिकाणी एकाचवेळी सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी केले जाणार आहे़ विशेष म्हणजे राज्यभरातील या फॉरेन्सिक लॅबच्या फर्निचरचे काम नाशिकच्या कांचन असोसिएट्सने अवघ्या ४० दिवसांत पूर्ण केले आहे़मुंबईतील महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे़ तर, नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी सोमवारी (दि़१५) सकाळी १०़३० वाजता केले जाणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत़ सद्यस्थितीत ई-बॅँकिंग, आॅनलाइन शॉपिंग, सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार गुन्हेगारी कृत्ये करीत आहेत. या गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर फॉरेन्सिक लॅब उभारण्याचे आदेश गृह विभागाने दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानुसार राज्यातील ४४ ठिकाणी सायबर फॉरेन्सिक लॅब उभारण्यात आले असून, या लॅबचे उद्घाटन येत्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे़ राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा ४४ सायबर फॉरेन्सिक लॅबच्या फर्निचरचे काम अवघ्या ४० दिवसांत नाशिकच्या कांचन असोसिएट्सने पूर्ण केले आहे़ (प्रतिनिधी)