शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पर्यटन करताहेत...सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:37 IST

नाशिक : हिरवाईने नटलेली डोंगररांग...सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे धबधबे... थंड वारा अन् पाऊसधारा अशा निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हिरवाईने नटलेली डोंगररांग...सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे धबधबे... थंड वारा अन् पाऊसधारा अशा निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे. ‘वीकेण्ड’ला पर्यटनाला जाताना सावधानता बाळगून सुरक्षितता राखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागासह पर्यटन विकास महामंडळाने केले आहे.  जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर, वणी, निफाड, पेठ अशा सर्वच भागांमध्ये मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे परिसर हिरवाईने नटला असून, सह्याद्रीच्या डोंगररांगेवरून धबधबे खळाळत आहेत. आजूबाजूच्या भात शेतीची खाचरे पाण्याने तुडूंब भरली आहेत.  परिसरात पावसाळी सहलीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. भावलीच्या गायवझरा, सुपवझरा या मोठ्या धबधब्यांसह अन्य लहान-मोठ्या धबधब्यांनी पर्यटकांना मोहिनी घातली आहे. शहरापासून ४० ते ५० किलोमीटर असलेल्या भावली परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्याचप्रमाणे अंजनेरी ते त्र्यंबकेश्वर व पहिणे, पेगलवाडी परिसरांतही गर्दी वाढत आहे. रविवारी (दि.२२) पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, पर्यटकांची गर्दीदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आषाढ अमावास्या असल्यामुळे तळीरामांकडून ओल्या पार्ट्या रंगविल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस, पर्यटन विभागाने ‘अलर्ट’ जारी केला आहे.निसर्ग सौंदर्याला अस्वच्छतेचा ‘डाग’ निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण या परिसरावर केली असली तरी या नैसर्गिक सौंदर्याला काही पर्यटक बेभानपणे वागून ‘डाग’ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यटकांकडून अस्वच्छता पसरविली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या, ग्लास, कॅरिबॅगचा कचरा पहावयास मिळतो. मद्यपींकडून फोडण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांच्या काचाही विखुरलेल्या दिसतात. पर्यावरणाला घातक असे प्रकार टाळण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.