शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशच्या आयात कराचा द्राक्ष पंढरीला फटका

By admin | Updated: February 27, 2016 22:10 IST

दुष्काळात तेरावा : उत्पादक चिंतातुर; केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी

कसबे सुकेणे : बांगलादेश सरकारने द्राक्षांवरील आयात कर किलोमागे ६० ते ६२ रुपये केल्याने त्याचा फटका सध्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना बसत असून, द्राक्षांच्या व लोकल बाजारभावात सुधारणा होत नसल्याने द्राक्ष पंढरीत निरुत्साहाचे ढग दाटले आहेत. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालण्याची मागणी उत्पादक करीत आहेत.द्राक्ष उत्पन्नात देशात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्यात देशाच्या विविध भागांतील व्यापारी डेरेदाखल झाले असून, प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत, ओझर, कसबे सुकेणे, उगाव, पालखेड, साकोरेमिग व दिंडोरी तालुक्यातील खेडगाव बाजारपेठेमध्ये द्राक्षांची आवक वाढली असली तरी, बाजारभावात मात्र सुधारणा होत नसल्याने द्राक्ष पंढरीत निरुत्साह संचारला आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचा बांगलादेश हा सर्वात मोठा ग्राहक आहे; परंतु बांगलादेश सरकारने आयात कर किलोमागे जवळपास ६० रुपये वाढविल्याने द्राक्षांची मागणी कमी झाली आहे. परिणामी मागणी व पुरवठा यात तफावत झाल्याने बाजारभावात सुधारणा होत नसल्याचे समजते. शिवाय देशांतर्गत प्रमुख बाजारपेठांमध्ये जम्बो काळी व्हरायटीचे सातारा, सांगली भागातील द्राक्षांची सर्वाधिक आवक झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी कमी असल्याचे व्यापाऱ्याकडून समजते. बांगलादेशाच्या वाढीव आयात करामुळे द्राक्ष उत्पादकांना किलोमागे २५ ते ३० रु पये कमी मिळत असल्याने शेतकऱ्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. अत्यल्प पर्जन्यमानात पाण्याचे नियोजन करून विविध संकटांचा सामना करीत जगविलेल्या द्राक्षबागांवर द्राक्ष उत्पादकांनी लाखो रुपये खर्च केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक चिंतातुर झाले आहेत. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी मौजे सुकेणेचे प्रकाश मोगल, सोमनाथ गंगाधर हळदे, सतीश मोगल, विलास मोगल, विजय मोगल, श्याम मोगल, संजय रहाणे, कसबे सुकेणेचे सुमित गांधी, धनंजय भंडारे, बबन शेवकर, दत्ता पाटील यांनी केली आहे.