शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आहारावरच प्रतिकारशक्ती अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST

नाशिक : आयुर्वेदात प्रत्येक ऋतूप्रमाणे दिनचर्या आणि आहाराची जोड देण्यात आली आहे. कारण आहारावरच आपली रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असल्याचे मत ...

नाशिक : आयुर्वेदात प्रत्येक ऋतूप्रमाणे दिनचर्या आणि आहाराची जोड देण्यात आली आहे. कारण आहारावरच आपली रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असल्याचे मत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत त्यांनी 'ऋतुमान आणि आहार' या विषयावर सोळावे पुष्प वैद्य डॉ. जाधव यांनी गुंफले. वसंतराव नेवासकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात डॉ. जाधव यांनी, कोरोना परिस्थिती, प्रत्येक ऋतूचे मानवी जीवनाशी निगडित असलेले महत्त्व, आहार आणि विहार आदी मुद्द्‌यांचा परामर्श घेतला.

प्रत्येक ऋतूचा प्रभाव आरोग्यावर होत असतो. ऋतूबदल होत असताना आहाराचे परिणामही बदलतात आणि रोगप्रतिकारक्षमतेस हे ऋतू कारणीभूत ठरतात. वसंत ऋतूमध्येच कोविडने जन्म घेतला. हिवाळ्यात शारीरिक बल उत्तम असते, ते बल सहाही ऋतूत निरोगी राहण्यासाठी क्षमता देते. मात्र या वातावरणात कफवर्धक आहार टाळायला हवा, असा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला.

पालेभाज्या संख्यात्मकदृष्ट्या कॅलरीज्‌ वाढवतात, मांसाहाराचे गुणधर्म वसंत ऋतूत शरीराला लागू होत नाहीत, पण भात मात्र बलकारक ठरतो, असेही जाधव यांनी सांगितले. ग्रीष्म ऋतूमध्ये फळांचा वापर वाढवावा, कोकमही पाचक असते, तर नारळपाणी बल आणि शीतलता देते. मसाल्यांध्येही हीच गुणवैशिष्ट्ये असल्याचे नमूद करून डॉ. जाधव यांनी मांस जड असल्याने ते टाळायला हवे, असेही स्पष्ट केले. कोविडच्या परिस्थितीत शरीरप्रकृती उत्तम ठेवावी. पावसाळ्यात रानभाज्या कटाक्षाने खाव्यात. कडधान्यांचा आहारात वापर असावा. उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊ नये. हा पदार्थ जड असल्याने शास्त्रकारांना हे अभिप्रेत नसल्याचे मत डॉ. जाधव यांनी नोंदविले.

यावेळी बांधकाम व्यावसायिक अरुण नेवासकर उपस्थित होते. याप्रसंगी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर आभार चिटणीस संगीता बाफना यांनी मानले.

----------------------------

आजचे व्याख्यान

वक्ते : डॉ. डी. एल. कऱ्हाड

विषय : कामगार आणि नोकरदारांपुढील आव्हाने

------------

फोटो

१६डॉ. जाधव