वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद शाखेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना एकूण ५८ शस्त्रक्रिया करू देण्यास सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्यावतीने मान्यता देण्यात आली. त्या निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएच्यावतीने या देशव्यापी बंदचे आयोजन केले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्व ॲलोपॅथी डॉक्टर्स सहभागी होणार असल्याचे आयएमएच्यावतीने कळविण्यात आले आहे.
इन्फो
संपाला आयुर्वेद, होमिओपॅथीचा विरोध
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) केलेल्या आवाहनानुसार आयुष अर्थात आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या डॉक्टरांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयुषच्यावतीने शिखर संघटनेचे सचिव डॉ. विनायक टेंभुर्णीकर, सचिव डॉ. आशुतोष गुप्ता आणि सहसंयोजक डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांनी आयएमएमच्या बंदचा निषेध केला आहे, तसेच नाशिक होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनने उद्या होणाऱ्या आयएमएच्या बंदमध्ये सर्व ग्रामीण आणि शहरी डॉक्टरांनी या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व होमिओपॅथी डॉक्टरांनी त्यांच्या सेवा नियमितपणे सुरूच ठेवण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने डॉ. स्वप्नील खैरनार, डॉ. दिलीप जाधव, डॉ. विलास कांगणे, डॉ. संजय दाभाडकर, डॉ. स्वाती घरटे यांनी केले आहे.