शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमध्ये अवैध वाळूचे ढीग

By admin | Updated: June 9, 2016 00:26 IST

रात्री वाहतूक : तक्रारी करूनही प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष; लागेबांधे असल्याचा संशय

 इंदिरानगर : परिसरात दिवसेंदिवस अवैध वाळूचे ढीग वाढत असताना महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत असून, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून अवैध वाळूची वाहतूक व ठिकठिकाणी असलेल्या ढिगाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे. परिसरातील विविध उपनगरांमध्ये अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या वसाहती वाढत असून, या भागात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उंच इमारती व अपार्टमेंटच्या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता भासते. त्यामुळे संगमनेर, कोपरगावसह जिल्ह्याच्या विविध भागातून रात्री दोन ते चार वाजेच्या सुमारास वडनेर गेट, पाथर्डी फाटा, वडाळा-पाथर्डी रस्ता, पिंगळे चौक आदि रस्त्यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रक सुरू असतात. यातील बहुतेक वाहनांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाळू भरलेली असते. यातील काही वाहनांवर परिवहन विभागाचा नोंदणी क्रमांकही नसतो. तर काहींवर तो पुसटसा दिसतो. या वाहनांमधून येणारी अवैध वाळू इमारत बांधकामाच्या ठिकाणी अथवा मोकळ्या मैदानावरील ढिगाऱ्यांवर खाली केली जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे ढीग दिसत असून, यातील अनेक ढिगाऱ्यांवर बिनधास्त वाळूची चढ-उतार होते. अनेकदा वाळूत वाहने अडकल्याने त्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रस्त होतो. या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना गुंडगिरीच्या भाषेचा सामना करावा लागत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. असे असतानाही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाळूच्या या काळ्याबाजाराला नक्की कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. (वार्ताहर)