शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू वाहतूक प्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:34 IST

सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर बोलेरो जीपमधून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयिताना वावी पोलिसांनी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : नाशिक - पुणे  महामार्गावर बोलेरो जीपमधून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या  दोघा संशयिताना वावी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून  सुमारे ९१ हजार रुपये किमतीच्या  देशी व विदेशी दारूच्या  बाटल्यांसह बोलेरो जीपही ताब्यात घेतली आहे.  सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक-पुणे महामार्गावर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूरशिंगोटे दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.  पोलीस हवालदार पी.के. अढांगळे, ए.के. जगधने, प्रकाश उंबरकर, यू.एस. खेडकर, डी. बी. दराडे हे नांदूरशिंगोटे - सिन्नर रस्त्यावर शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना गर्जे पेट्रोलपंपाजवळ बोलेरो जीप संशयितरीत्या उभी असल्याची माहिती मिळाली.  पोलिसांनी जीपची तपासणी केली असता त्यात देशी व विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी गणेश बबन रोडे (३५), रा. पळसे व कुणाल नाना महापुरे (३५), रा. हिरावाडी, नाशिक या संशयितांना ताब्यात घेतले असून, जीपमधील बॉबी संत्रा देशी दारूच्या १०५६ बाटल्या, मॅकडॉल-९६ बाटल्या, बिअरच्या २४ बाटल्या असा ९१ हजार ७५२ रुपयांचा माल जप्त केला. त्याचबरोबर चार लाख रुपये किमतीची बोलेरो जीप जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुख्तार सय्यद, पी. के. अढांगळे अधिक तपास करीत आहेत.