शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:47 IST

मालेगाव : गिरणानदीला पुरपाणी सुरू असतानाही वाळु माफियांकडून शहरालगतच्या टेहरे व रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील नदी पात्रातुन अवैधरित्या बिनभोबाटपणे वाळुउपसा सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार महसुल विभागाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. महसुल विभागाच्या वरदहस्ताने वाळु चोरट्यांकडून दिवसाढवळ्या वाळु चोरी केली जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : महसुल विभागाचे दुर्लक्ष; कारवाईची मागणी 

मालेगाव : महसुल विभागाचे दुर्लक्ष; कारवाईची मागणी मालेगाव : गिरणानदीला पुरपाणी सुरू असतानाही वाळु माफियांकडून शहरालगतच्या टेहरे व रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील नदी पात्रातुन अवैधरित्या बिनभोबाटपणे वाळुउपसा सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार महसुल विभागाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. महसुल विभागाच्या वरदहस्ताने वाळु चोरट्यांकडून दिवसाढवळ्या वाळु चोरी केली जात आहे.तालुक्यातील गिरणा व मोसमनदी पात्रातुन वाळु चोरीचे प्रकार महसुल विभागाला थांबविता येत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सर्रास अवैध वाळु उपसा सुरू आहे. सध्या मोसम व गिरणा नदीला पुरपाणी सुरू आहे. अशा परिस्थितीत वाळु उपसा करता येत नाही. यावर वाळु चोरट्यांनी मात करत शहरालगतच्या टेहरे शिवारात अवैध वाळु उपसा सुरू केला आहे. सकाळच्या सत्रात बैलगाडी व ट्रॅक्टरमधुन सर्रास वाळु उपसा होत आहे. शेतकºयांच्या विरोधाला न जुमानता सर्रास वाळु उपसा केला जात आहे.नदी किनारी असलेल्या विहिरीवरील शेतीपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांनी महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना वाळुचोरीची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर थातुर मातुर कारवाई केली जाते. तालुक्यातील नदीपात्रातुन तसेच वन जमिनीतुन सर्रासपणे वाळु, मुरुम, दगड आदिची वाहतूक केली जात आहे. वाळु उपसा प्रतिबंधक पथकाकडूनही कारवाई केली जात नसल्यामुळे वाळुमाफियांचे धारिट्य वाढले आहे. सवंदगाव शिवार, गिरणानदी पात्र, मोसमनदी पात्र, वनविभागाच्या जंगलांमधुन सर्रासपणे गौणखनिजाची वाहतूक केली जात आहे. महसुल विभागाच्या वरदहस्तामुळे गौणखनिज चोरीला जात आहे. वाळु माफियांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.