शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी, पथदीप समस्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: August 27, 2016 00:16 IST

प्रभाग सभा : लोकप्रतिनिधी संतप्त

पंचवटी : गेल्या अनेक महिन्यांपासून घंटागाडी अनियमित येत असल्याची तक्र ार करूनही प्रशासनाला जाग येत नाही. पथदीपांसाठी पोल उभारलेली मात्र त्यावर फिटिंग नाही. प्रशासनाला वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींनी प्रभाग बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.प्रभाग सभापती रूचि कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ११ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. पंचवटी विभागात घंटागाडी कधीच वेळेत येत नाही. उशिराने घंटागाडी येत असल्याची तक्र ार रंजना भानसी यांनी केली. औरंगाबादरोडवर पथदीपांसाठी पोल उभारून अडीच वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्याप फिटिंग बसविलेल्या नाही. विद्युत विभागाने फिटिंग बसवाव्यात किंवा पोल काढून घ्यावे व जे नुकसान झाले त्याचा खर्च अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा, असे उद्धव निमसे यांनी सांगितले. इंदिरा गांधी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची संख्या वाढविणे, विद्युत विभागाच्या समस्या व विकासकामांसाठी विभागीय अधिकाऱ्यांना निधी वाढवून देण्याबाबत ठराव करून आयुक्तांची भेट घेणार असल्याचे उपमहापौर गुरमित बग्गा यांनी सांगितले. इंदिरा गांधी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याची तक्र ार नागरिक करत असल्याने प्रशासनाने दखल घ्यावी, असे डॉ. विशाल घोलप यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सुनीता शिंदे, ज्योती गांगुर्डे, शालिनी पवार, फुलावती बोडके, रूपाली गावंड, सिंधू खोडे, परशराम वाघेरे, विभागीय अधिकारी अशोक वाघ, राहुल खांदवे, संजय गोसावी, वसंत ढुमसे, आर. एम. शिंदे आदिंनी सहभाग घेतला. (वार्ताहर)